शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सुशांत सिंग मृत्यूचे कनेक्शन गोव्यातील रेव्ह पार्टीशीही?, गौरव आर्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 19:27 IST

Sushant Singh Rajput Suicide : एनसीबीची टीम मुंबईसह गोव्यात दाखल

ठळक मुद्देया प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) क्षेत्रीय विभागाचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. 

पणजी/ म्हाप्सा :  बॉलिवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध गोव्यातील एका हॉटेल उद्योजकाशी असल्याचे आढळून आले आहे. तसेच अलिकडेच गोव्यात वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीत अंमली पदार्थांचा पुरवठा होण्याचे गूढही याच प्रकरणाकडे जोडले जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) क्षेत्रीय विभागाचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. 

 

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. गोव्यातील रिसॉर्ट असलेले हॉटेल उद्योजक गौरव आर्या या प्रकरणात एनसीबीच्या रडारखाली आला आहे. सुशांत सिंगच्याया मृत्यू प्रकरणाचा अंमली पदार्थांचा  संबंध उघडकीस आल्यामुळे एका वेगळ्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.  या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती व  गौरव आर्या यांच्या कथित सोशल मिडिया चँट्स  हाती लागल्याचा दावा तपास एझन्सीने केला आहे. त्यामुळे आर्या याची चौकशी या प्रकरणात आवश्यक बनली आहे. एनसीबीचे पच्छीम विभागीय पथक यासाठी गोव्यात दाखल झाले आहे. दिल्लीहून या तपास कामाचे संचालन केले जात आहे. दरम्यान 16 ऑगस्ट रोजी गोव्यात एक रेव्हपार्टी झाली होती व गोवा क्राईम ब्रँचने त्यावर कारवाई करून ती बंद पाली होती. या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर झाला होता. 6 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात हा अंमली पदार्थ नेमका कोठून आला याविषयी तपास सुरू आहे. आर्या याच्यावरही एनसीबीचा संशय आहे. एनसीबीने  अद्याप गोवापोलिसांची या पथकाने संपर्क केलेला नाही. सहाय्यासाठी किंवा इतर तांत्रिक कारणासाठीही त्यांनी अद्याप गोवा पोलिसांना माहिती दिलेली नाही अशी माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.रेव्ह पार्टीचा कोणत्याही प्रकारे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणापेक्षा सुशांत सिंग प्रकरणातील ड्रग्स कांडाशी अधिक असल्याची शक्यता एनसीबीला आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात तपास करीत असलेली गोवा क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात कोणतीही माहिती किंवा राष्ट्रीय चनलच्या वृत्तांना दुजोरा देणेही  टाळले आहे. हणजुणे येथे दोन रिसॉर्ट असलेला आर्या हा शिवोली येथे एका भाड्याच्या फ्लँटमध्ये मागील 1 वर्षाहून अधिक काळ राहत होता. मागील 5 महिन्यांपासून तो तिथे फिरकला नसल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात आले.कडक  गोपनियतादरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे क्षेत्रीय पथक गोव्यात दाखल झाले असले तरी गुरूवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत हे पथक गोव्यातील हणजुणे येथील आर्या याच्या  दोन पैकी एकही रिसॉर्टवर पोहोचले कुणी पाहिले नाही. टीव्ही चनलवाले सकाळी 8 वाजल्यापासून या त्याच्या  रिसॉर्टवर तळ ठोकून आहेत. विलक्षण कुतूहलाची बाब म्हणजे रिसॉर्टला बाहेरून टाळे आहे परंतु आत वातानुकुलीन यंत्रणे चालू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवाय हॉटेलच्या पार्कींग लॉटमध्ये दोन अलिशान कारगाड्याही आहेत. या ठिकाणीच रहाणाऱ्या नागरिकाने दिलेल्या माहतीनुसार पहाटे 4 वाजता 2 माणसे या ठिकाणी साध्या वेषात आली होती व रिसॉर्टमध्ये गेली होती.  त्यामुळे ही दोन माणसे आर्या व त्याचा सहकारी होती की एनसीबीचे अधिकारी होते या बद्दलही स्पष्टता आलेली नाही.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

 

सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसgoaगोवाDrugsअमली पदार्थ