शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

Sushant Singh Rajput Suicide : सीबीआयने मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 20:24 IST

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या सीए, सिद्धार्थ पिठानीचीही  झाडाझडती

ठळक मुद्देवांद्रे पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणेकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीला हजर मंगळवारी समन्स बजाविण्यात आले आहे. crim

मुंबई -   अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी  सीबीआयच्या विशेष पथकाने आता यापूर्वी तपास करणाऱ्या मुंबईपोलिसांच्या कार्यपद्धतीकडे नजर वळविली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणेकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीला हजर मंगळवारी समन्स बजाविण्यात आले आहे. त्यांनी केलेला तपास, त्यातील संथगती आणि त्रुटी आदीबाबत त्यांच्याकडे बुधवारी सखोल  विचारणा केली जाईल,असे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले.  

दरम्यान,  विशेष पथकाने मंगळवारी सुशांतचा लेखा परीक्षक (सीए) संदीप श्रीधर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या गेस्ट हाऊस येथे डीआरएच्या संदीप श्रीधर व सुशांतच्या परिचयातील तिघांना चौकशीसाठी केली. ईडीकडून मिळालेला दस्ताऐवज, सुशांतचे बँक अकाउंटचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक, आयटीआरबद्दल सविस्तर तपशील सीएकडून माहिती करून घेतला.

 विशेष पथकाने तपासासाठी पाच  टीम केल्याअसून सुशांतची आत्महत्या आणि त्याचा वडिलांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने प्रत्येक बाजू व सर्व शक्यता गृहित धरून बारकाईने तपास करण्यात येत आहे. त्यासाठी 14 जूनपासून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलिस अधिकारी बेळणकर, उपनिरीक्षक जगतापकडे सविस्तर विचारणा केली जाणार आहे. दोन महिन्यातील तपास, आणि एफआयआर न घेता केवळ  सीआरपी अंतर्गत चोकशी करणे,, 56 जणांचे नोंदविलेले  जबाब आदीबाबत त्यांच्याकडे चोकशी केली जाणार असून बुधवारी हजर रहाण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, तपास पथकाने सिद्धार्थ पिठानी याला मंगळवारी सकाळी पुन्हा चौकशी करण्यात आली. त्याप्रमाणे सीए  संदीप आणि सुशांतच्या परिचयातील अन्य तिघांकडेही सुमारे सहा तास स्वतंत्रपणे चोकशी केली. त्यांचे जबाब रेकॉर्ड करून घेण्यात आले...तर पोलीस उपायुक्त त्रिमुखेचीही चौकशी?वांद्रे पोलीस ठाण्यातील दोघा तपास आधिकाऱ्यांकडे सीबीआय सविस्तर चौकशी करेल, धिमा तपास, 56 जणांचे जबाबाबात समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता, ते परिमंडळ -8 चे उपयुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याकडे चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबईPoliceपोलिस