शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Sushant Singh Rajput:"...तर राजकीय वळण लागले नसते; माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी सिद्धार्थवर दबाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 06:44 IST

सुशांतच्या आत्महत्येनंतर आयपीएस ओ.पी. सिंह हे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे सिद्धार्थनेच स्वत: फोन करून सांगितल्याचे रियाचे म्हणणे आहे.

मुंबई : सिद्धार्थ पिठानी याला माझ्याविरुद्ध पोलिसांना जबाब देण्यासाठी सुशांतचे नातेवाईक आयपीएस अधिकारी ओ.पी. सिंह यांच्याकड़ून दबाव येत असल्याचा दावा रिया चक्रवर्तीने नुकत्याच केलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर आयपीएस ओ.पी. सिंह हे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे सिद्धार्थनेच स्वत: फोन करून सांगितल्याचे रियाचे म्हणणे आहे. तेव्हा सिद्धार्थला जे योग्य आहे तेच सांगण्याची मी विनंती केली होती, असे रिया म्हणाली.सुशांतवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कधीच केला नाहीसुशांतवर मी कधीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या घरात असलेल्या व्यक्तींची नेमणूकही मी केली नाही. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आधीपासून त्याच्यासोबत राहत होता. तर मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला सुशांतची बहीण प्रियंकाने कामावर ठेवले होते, असे रियाचे म्हणणे आहे.

एनसीबीच्या पथकानेही वाढवला तपासाचा वेगड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआय, ईडीपाठोपाठ आता अमली पदार्थविरोधी पथकानेही (एनसीबी) तपासाचा वेग वाढवला आहे. त्यांनी शुक्रवारी ईडीकड़ून तपासासंबंधित कागदपत्रे ताब्यात घेतलीे. मुंबईसह राज्यभरातील ड्रग कनेक्शनच्या माहितीसाठी एनसीबीच्या पथकाकड़ून माहिती गोळा करण्यात येत आहे. तसेच काही विदेशी तस्करही त्यांच्या रडारवर असून, त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सुशांतला ड्रग पुरविणाऱ्याच्या तपासासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांसह खबरीही कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.थेट तक्रार का केली नाही?पोलीस अधिकारी असलेल्या ओ.पी. सिंह यांच्या व्हायरल झालेल्या संवादाबाबत बोलताना, सिंह यांनी थेट एखाद्या मुलीला पकडून कारागृहात टाकण्याबाबत बोलणे हे चुकीचे असल्याचे रियाने म्हटले. त्यांना माझा संशय होता तर मुंबईत आल्यानंतर कॉफी शॉपमध्ये खाण्याचा आनंद घेण्यापेक्षा त्यांनी थेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार का दिली नाही, असा सवालही तिने केला....तर राजकीय वळण लागले नसतेमुंबई पोलिसांनी तातडीने चौकशी करून न्यायदंडाधिकºयांपुढे अहवाल सादर केला असता तर या घटनेला राजकीय वळण लागले नसते. या प्रकरणाचा तपास सीबीआय हाती घेईपर्यंत मुंबई पोलिसांनी रियाची चौकशी केली नाही. मुंबई पोलीस जाणूनबुजून उशीर करत आहे, हेतूपुरस्सर रियाची चौकशी केली जात नाही, असे आरोप मुंबई पोलिसांवर झाले. यामधूनच राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि काही राजकीय लोक संशयाचे भूत निर्माण करण्यात यशस्वी झाले. मात्र नुसता संशय निर्माण करून कोणी आरोपी होत नाही, असे निकम म्हणाले....म्हणून रियाने घराऐवजी गाठले पोलीस ठाणेसीबीआयच्या १० तासांच्या चौकशीनंतर रात्री नऊ वाजता रिया चक्रवर्ती सीबीआय कार्यालयातून भाऊ शौविकसह जूहूच्या घराकडे आली. मात्र इमारतीबाहेर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी केलेल्या गर्दीमुळे घरी जाता न आल्याने तिने थेट सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलिसांकडे तिने सुरक्षेची मागणी केली. त्यानुसार सांताक्रुझ पोलिसांनी तिला घरापर्यंत पोहचवले. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती