शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतसिंह राजपूत ड्रग्स प्रकरण; रियासह ३३ जणांवर दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:42 IST

गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (एनसीबी)ने शुक्रवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोषारोपपत्रात ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात ११,७०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण ३३ आरोपींपैकी अद्याप आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.

गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ, आरोपींनी स्वतःहून दिलेली माहिती, तांत्रिक पुरावे, उदा. मोबाइल कॉल्स, व्हाॅट्सॲप चॅट, बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन खोलवर तपास करण्यात आला, असे तपास यंत्रणेने सांगितले. तपासादरम्यान देशी, परदेशी चलन जप्त करण्यात आले आणि संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पर्यावरणाचा विचार करून अंदाजे ५०,००० पानांचे दोषारोपपत्र इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये न्यायालयात सादर करण्यात आले. तपास पुढे सरकल्यावर पुरवणी दोषारोपपत्र सादर करू, असे एनसीबीने सांगितले. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती