शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 21:29 IST

पहिल्या टप्यात हे पथक दहा दिवस मुंबईत तळ ठोकून राहणार असून मुंबई महापालिकेने त्यांना विलीगीकरण (क्वारटाईन ) करण्यापासून सूट दिली आहे. 

मुंबई - बहुचर्चित सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने  (सीबीआय) बनविलेले विशेष पथक (एसआयडी)दिल्लीहून गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. उपमहानिरीक्षक मनोज शशीधर यांच्या नेतृत्वाखालील सुमारे 15  अधिकाऱ्यासह फॉरेंसिक एक्सपर्टचाही त्यात समावेश आहे. शुक्रवारी सकाळी मुंबई पोलिसांकडून  गुन्ह्यांच्या तपास कामाचे पेपर ताब्यात घेईल असे सांगण्यात आले.

दरम्यान, पहिल्या टप्यात हे पथक दहा दिवस मुंबईत तळ ठोकून राहणार असून मुंबई महापालिकेने त्यांना विलीगीकरण (क्वारटाईन ) करण्यापासून सूट दिली आहे.  सीबीआयने ईमेलवरून त्याबाबत केलेली विनंती महापालिका प्रशासनाने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूबाबत त्याचे वडील के. के. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून  पाटणा पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर आणि  त्याचा तपास सीबीआयला देण्याचा  बिहार सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वेध ठरविला. त्यानुसार त्याच्या तपास कामासाठी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. त्यामध्ये शशीधरण यांच्याशिवाय महिला उपमहानिरीक्षक गगनदीप गंभीर, अधीक्षक नुपूर प्रसाद, अप्पर अधीक्षक  अनिल यादव या वरिष्ठ अधिकारी आणि चार निरीक्षक व अन्य उपनिरीक्षक,  अंमलदाराचा समावेश आहे.

मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक सुवेझ हक यांच्या नेतृत्वाखालील एक पथक त्यांना सहकार्य करणार आहे.  मुंबई पोलीस आणि सीबीआयचे विशेष पथक यांच्यात  समन्वयासाठी सुवेझ  हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

त्याशिवाय या पथकामध्ये फॉरेनसिक एक्सपर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांचाही समावेश करण्यत आला आहे.  गुप्ता यांनी  बहुचर्चित शीना बोरा हत्या , सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.  या पथकामध्ये आवश्यकतेनुसार सीबीआयचे आणखी काही अधिकारी सहभागी होतील. पहिल्या टप्यात दहा दिवस मुंबईत रहाणार असून  त्यांना तपास कामासाठी मुंबई महापालिकेने क्वारंटाईन होण्यापासून सूट दिली आहे.

असा होणार तपास

सीबीआयची एसआयडी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 ते 4अधिकाऱ्यांची एकूण सहा स्वतंत्र पथके बनवणार आहे.  एक पथक मुंबई पोलिसांकडून केलेल्या तपासाची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्याची शहनिशा करेल, दुसरी पथक अभिनेत्री रिया चक्रवती,  तिच्या कुटूंबीय आणि अन्य सबाधिताकडे चोकशी करेल, एक पथक सगळ्याचे फॉरेनसिक रिपोट जमा करेल, तर काहीजण संबधिताच्या आर्थिक व्यवहार, ईडीने केलेल्या तपासाची माहिती घेईल, त्याचप्रमाणे मृत्यूचा नेमका उलगडा होण्यासाठी सुशांत वांद्रे येथील फ्लॅटमध्ये जाऊन  मृत्यूचा  'रिक्रिएट क्राईम सीन ' करेल, त्यानंतर सर्व धागेदोरे  जुळवून, शक्यता पडताळून नोंदी केल्या जातील.

ईडीकडून दिग्दर्शक रुमी जाफरीची चोकशी

ईडीने रिया चक्रवती आणि अन्य पाच जणांवर दाखल केलेल्या मनी लोड्रीगच्या गुन्ह्याप्रकरणी गुरुवारी दिग्दर्शक रुमी जाफरी याच्याकडे सुमारे 7 तास सखोल चोकशी केली . सुशांतला देण्यात आलेले मानधन, त्याच्या व्यवहाराच्या पद्धतीबाबत त्याच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते.

गृहमंत्र्याकडून आयुक्ताना सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीसे बॅकफूटवर आलेल्या मुंबई पोलीस आयुक्त यांना गुरुवारी  पुन्हा गृहमंत्री अनिल देशमुख यानी  बोलावून घेतले. मंत्रालयात सुमारे दोन तास चर्चा करीत योग्य सूचना केल्या.  त्यांनंतर आयुक्त परमबीर सिग यांनी सीबीआयच्या पथकाला पुर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे पत्रकाराशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCBIगुन्हा अन्वेषण विभागSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत