शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Sushant Singh Rajput: सीबीआय पथकाकडून सुशांतच्या फ्लॅटची तपासणी; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचेही जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 02:48 IST

इमारतीच्या परिसरातही कसून शोध, या पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडिओ शूटिंग घेण्यात आले. त्याच बरोबर फॉरेंसिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने शनिवारी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटची कसून तपासणी केली. सुमारे सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी पूर्ण इमारतीचा परिसर, टेरेस धुंडाळून काढीत काही नोंदी घेतल्या. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा प्रसंग पुन्हा बनवून तपासला. तत्पूर्वी कूपर रुग्णालयात जाऊन १४ जूनला कक्षात ड्युटीवर असलेले आणि शवविच्छेदन करणाºया अशा एकूण पाच जणांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे शुक्रवारी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली होती. शनिवारी सकाळपासून त्यांनी तपासाला गती दिली. १५ अधिकाºयांच्या पथकाच्या पाच स्वतंत्र टीम बनविण्यात आल्या. फॉरेंसिक एक्स्पर्टसह त्यांना माहिती व सहकार्य करण्यासाठी मुंबई पोलिसांचे अधिकारीही सोबत होते. एका पथकाने बांद्रा पोलीस ठाण्यात जाऊन तपास अधिकाºयांशी चर्चा केली. त्यांना सोबत घेऊन सुशांतच्या देहाचे विच्छेदन केलेल्या कूपर रुग्णालयात पोहोचले. त्यादिवशी कक्षात ड्युटी असलेले व शवविच्छेदन करणाºयांचे सविस्तर जबाब नोंदविले. त्यावेळी इतक्या तत्परतेने ‘पीएम’ का करण्यात आले, अशी विचारणा केली असता, मुंबई पोलिसांकडून तशा सूचना करण्यात आल्याचे डॉक्टरानी सांगितले.सर्व तपासाचे चित्रीकरणया पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडिओ शूटिंग घेण्यात आले. त्याच बरोबर फॉरेंसिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली. त्याचे अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास सीबीआयचे पथक सुशांतसिंह राजपूत राहत असलेल्या बांद्रा येथील सोसायटीत गेले. त्यावेळी पथकातील अधिकाºयांनी सिद्धार्थ पिठाणी, सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज आणि दीपेश यांनाही सोबत घेतले होते. त्यांचेही जबाब नोंदवण्यात आले.आत्महत्येचे रिक्रिएशन : काही अधिकाऱ्यांनी सुशांतचा बेडरूममध्ये सिद्धार्थ, नीरज व दीपेश यांनी दिलेल्या माहिती आणि पोलिसांच्या पंचनाम्याचा आधारे ‘सीन आॅफ क्राईम रिक्रिएट’ करण्यात आला. सुमारे सहा तासांहून अधिक काळ फ्लॅटमध्ये थांबून होते. एका टीमने इमारतीत सुशांतच्या शेजारी राहत असलेल्याकडे चौकशी केली. यावेळी पूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभाग