शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Case : एनसीबीच्या टार्गेटवर आता सॅमचा 'बॉस', बॉलीवूडमध्ये 'ड्रग अंकल' म्हणून ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 20:45 IST

Sushant Singh Rajput Case : शुक्रवारी अटक केलेल्या तस्कर राहिल विश्राम हा बॉलीवूडमधील या 'बॉस' च्या सूचनेनुसार अंमली पदार्थाची डिलिव्हरी करीत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनप्रकरणी अभीनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या अटकेनंतर राहिल विश्वास याच्यावरील कारवाई मोठी मानली जाते. एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी वसई येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त केला.

मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडमधील  ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीचा तपास आता या क्षेत्रात 'बॉस'म्हणून ओळखल्या जाणाऱ्याच्या पर्यंत पोहचला आहे. शुक्रवारी अटक केलेल्या तस्कर राहिल विश्राम हा बॉलीवूडमधील या 'बॉस' च्या सूचनेनुसार अंमली पदार्थाची डिलिव्हरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पथकाकडून आता त्याचा शोध घेतला जात आहे.   

दरम्यान, तस्कर राहिल विश्राम हा  चित्रपटसृष्टीत सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखला जात होता, या नावाने त्याच्याकडे  'मालाची ' मागणी केली जात असे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राहिलकडे केलेल्या चौकशीतून या नशाबाजीमध्ये गुंतलेल्या अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. राहिल हा 'बॉस' या नावाने बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ड्रग्ज संबंधित व्यक्तींना पुरवित असे. त्याचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध असून तो अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता यांपैकी कोणीही असू शकतो. त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. 

बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनप्रकरणी अभीनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या अटकेनंतर राहिल विश्वास याच्यावरील कारवाई मोठी मानली जाते. सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिलकडून अनेक महत्वपूर्ण बाबी समोर येणार आहेत. 

'त्या' पार्टीच्या व्हिडीओची सत्यता  पडताळणारकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमली पदार्थांचा वापर करण्यात आला होता की नाही,  याची चौकशीही एनसीबीकडून सविस्तरपणे  करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणतीही गडबड केली जाणार नाही. कथित व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.वसईतून चार कोटीचे कोकेन जप्तएनसीबीच्या पथकाने शुक्रवारी वसई येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त केला. त्याची किमत चार कोटी असून याप्रकरणी एस. घंगाळेला अटक केली आहे. तो प्रॉपर्टी डीलर असून त्याच्याकडूनअंमली पदार्थाचे सेवन करीत असलेली  'हाय प्रोफाइल ' नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरवातीला इथिओपियाच्या अदिस अबाबा येथून दिल्ली आलेल्या एका पार्सलमधून  670 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्याच्या तपासाची तार वसईपर्यंत पोहचली आहे, याबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक (अभियान ) केपीएस मल्होत्रा यांनी शनिवारी दिल्लीत एका वृत्तसंस्थेला सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती

 

नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती