शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

NCBचा कारवाईचा धडाका! शोविकचे ड्रगसंबंधी चॅट आले समोर, सात तस्करांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 20:48 IST

Sushant Singh rajput Case : तस्करांचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देगौरव आर्या आणि रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हे त्याच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा  व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत

मुंबई -  अंमली पदार्थची तस्करी व विक्री करणाऱ्या तस्कराविरुद्ध एनसीबीने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसात गोवा व मुंबईतून पाचजणांना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या तस्करांचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. गौरव आर्या आणि रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हे त्याच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा  व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.गौरव आर्या हा  बासित परिहार याच्या संपर्कात होता. तो टॅक्सी ड्रायवरचे काम करतो, इच्छुक ठिकाणी त्याचबरोबर मालाची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात होती.  रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज समोर आले आहेत. त्यानुषंगाने त्याची, गौरव आर्या, रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित यांच्याकडे एनसीबी चौकशी  करणार आहे. त्यचबरोबर ड्रग तस्कराकडून पदार्थाची खरेदी करणाऱ्याकडे बालीवूडमधील 20 जणाची नावे समोर आली आहेत. त्याच्याकडे लवकरच चौकशी केली जाणार आहे.

 

सुशांतच्या कुटूंबियांना त्याच्या आजाराबद्दल माहितीसुशांत हा डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर ओषधोपचार घेण्यात येत होते, याबद्दल त्याच्या वडिलांबरोबरच बहिणीना  कल्पना होती, ही बाब मोबाईलवरील चॅटवरून स्पष्ट झाली आहे. सुशांत आणि तिची बहिण प्रियंका यांच्यातील चॅट समोर आले आहे. तो झोपेच्या गोळ्या घेत होता त्याबद्दल तिने प्रिस्किप्शन पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

टॅग्स :Drugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीArrestअटक