शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 16:42 IST

कोर्टाने दिपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयावरुन कायदेशीर वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअंमली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत दिपेश सावंत, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह सात जणांना अटक झाली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंत याला काल अटक केली होती. त्यानंतर आज एनसीबीने दिपेश सावंतला कोर्टात हजर केले. 

कोर्टाने दिपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयावरुन कायदेशीर वाद सुरू होण्याची शक्यता आहे. एनसीबीने दिपेश सावंतला बेकायदेशीर अटक केल्याचे दिपेश सावंतच्या वकिलांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी एनसीबीविरोधात अर्ज दाखल केला असून यावर कोर्टाने एनसीबीला उत्तर देण्यास सांगितले आहे, असे दिपेश सावंतचे वकील राजेंद्र राठोड यांनी म्हटले आहे.

वकील राजेंद्र राठोड म्हणाले, "दिपेश सावंत ४ सप्टेंबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे आणि त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांच्या आत कोर्टात हजर केले पाहिजे होते. २४ तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवण्याच्या विरोधात आम्ही कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात कोर्टाने एनसीबीकडे उत्तर मागितले आहे."

दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत दिपेश सावंत, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह सात जणांना अटक झाली आहे. यापैकी दीपेश, शौविक, सॅम्युअल, जैद यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे.

रियाचा भाऊ शौविक आणि मिरांडालाही अटककाल सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यानंतर शौविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे. 

आणखी बातम्या...

- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप    

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला      

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCourtन्यायालय