शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ईडीचे जया सहाला समन्स; आर्थिक व्यवहाराचीही चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 03:02 IST

ड्रग्ज कनेक्शन तपासणार

मुंबई - ‘पेज थ्री’ वर्तुळात ड्रग्ज तस्करी (पेडलर) करणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया सहा हिला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी समन्स पाठविले. सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमवेत तिचा ड्रग्जच्या वापराबाबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आल्याने तिची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये यासंदर्भात व्यवहार झाला आहे का, हे तपासले जणार असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

जया सहा पूर्वी सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदीच्या टीममध्ये कामाला होती. केव्हन्ट टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून ती काम करते. पेज थ्री पार्टीत ती अमलीपदार्थ पुरवते, असे सांगितले जाते. सुशांतच्या बँक खात्यावरून तिच्या खात्यात काही रक्कम वर्ग केली. त्यानंतर ती तिच्या खात्यावरून रिया व तिचा भाऊ शोविकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे. याची ईडी चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये एमडीएमएचा उल्लेखरिया चक्रवर्तीच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये एमडीएमए, गांजा अशा उत्तेजक पदार्थांचा उल्लेख आहे. जया सहा हिला तिने ड्रग्जच्या वापराबाबत विचारल्यावर तिने ‘चहा किंवा पाण्यात ४ थेंब वापर आणि त्याला पिऊ दे,ङ्घकिक बसायला ३०-४० मिनिटे दे’ असा मेसेज केला आहे. एका कथित चॅटमध्ये रियाने गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी संभाषण केले आहे. ती म्हणते, ‘हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचे तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला’. या मेसेजनंतर ‘आपल्याकडे एमडीएमए आहे का?’ असा मेसेज तिने ८ मार्च २०१७ रोजी केला होता.

अन्य एका संभाषणात रियाच्या फोनमध्ये ‘मिरांडा सुशी’ म्हणून सेव्ह केलेल्या नंबरवरून सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचा, ‘हाय रिया, स्टफ (माल) जवळजवळ संपला आहे,’ असा रियाला मेसेज आहे. त्यानंतर मिरांडा रियाला विचारतो, ‘शोविकच्या (रियाचा भाऊ) मित्राकडून आपण ते घ्यायला पाहिजे का? पण त्याच्याकडे नुसतेच हॅश अ‍ॅण्ड बड (कमी प्रतिचे ड्रग्ज) आहे.’रियाने ड्रग्जचे सेवन केले नसल्याचा वकिलांचा दावारियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असा दावा तिचे वकील अ‍ॅड. सतीश माने-शिंदे यांनी केला आहे.

सुशांतने रियाला दिले होते ड्रग्ज सोडण्याचे आश्वासनसुशांतला ड्रग्जचे व्यसन असून यातून बाहेर पडण्याचे त्याने आश्वासन दिल्याचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज रियाने सुशांतची माजी व्यवसाय व्यवस्थापक श्रुती मोदीला केल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आता पुढील तपास हाती घेण्यात आल्याचे समजते.मानवाधिकार आयोगाची ‘कूपर’ला नोटीससुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाने पालिकेच्या कूपर रुग्णालयाला आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने रुग्णालयातील शवागारात सुशांतच्या मृतदेहाची पाहणी केली होती. केवळ कुटुंबातील व्यक्तींनाच शवागारात परवानगी दिले जाते. मग, रियाला मृतदेहाची पाहणी कशी काय करू दिली? याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागविले आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीDrugsअमली पदार्थCBIगुन्हा अन्वेषण विभाग