शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितले; ८ जूनला काय घडलं? रियाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:49 IST

मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज समोर आणले आहेत.

मुंबई : सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज कनेक्शन समोर येत असतानाच, दोन महिन्यांनी तिने प्रसारमाध्यमांसमोर मौन सोडले. ‘मला नव्हे, तर सुशांतला ड्रग्जचे व्यसन लागले होते. मी नेहमीच त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला’, असा खुलासा तिने केला.

मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज समोर आणले आहेत. रियाने डिलीट गौरव आर्या, जया सहासोबतच्या डिलिट केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप संवादातून ड्रग्ज कनेक्शन उघड झाले. मात्र हे सर्व आरोप फेटाळून, आपण कधीच ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे रियाने नमूद केले. व्हॉट्सअ‍ॅप चॅटनुसार, २०१७ मधील संवादात रियाने गौरव आर्यासोबत एमडी घेण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मेसेजबाबत खुलासा करताना आपण कुठलीच मागणी केली नसल्याचे रियाचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये चहात सीबीडीचे चार थेंब टाकण्याबाबत जयाने सल्ला दिला होता. सुशांतनेच जयासोबत संपर्क करत ते औषध घेतल्याचे नमूद केले होते, असे रिया म्हणाली.सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितलेमला माझे साधे पूर्वीचे आयुष्य जगायचे आहे. मोकळा श्वास घ्यायचा आहे. पण मी लढणार. आज सुशांत स्वप्नात आला. त्यानेच मला आवाज उठवण्यास सांगितल्याने मी माध्यमांसमोर आले.

आईच्या निधनानंतर तणावात पडली भरसुशांतच्या वडिलांनी लहानपणीच त्याला आईपासून दूर केले. त्यात आईच्या निधनानंतर तो आणखी तणावात गेला. पाच वर्षे वडिलांना तो भेटला नसल्याचे रिया म्हणाली.

८ जूनला काय घडले?रियाच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे सुशांत जास्त खचला. मी नेहमीच त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यात माझीही तब्येत बिघडत चालल्याने सुशांतने मला घरी जाण्यास सांगितले. ८ जून रोजी माझी थेरेपी असल्याने ती पूर्ण करून जाते असे सांगूनही तो मला जा म्हणाला. त्याची बहीण येणार असल्याचे तो म्हणाला. ९ जूनला फक्त तब्येत कशी आहे? असा सुशांतचा संदेश आला. १० जूनला त्याने शोविककडे तब्येतीची चौकशी केली.

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभाग