शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

'रियानेच सुशांतला ड्रग्सच्या आहारी जाण्यास भाग पाडलं', NCB च्या चार्जशीटमध्ये गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 12:17 IST

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात महत्वाची नोंद केली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड राहिलेल्या रिया चक्रवर्तीला तिच्या सहकलाकारांकडून आणि भाऊ शोविक यांच्याकडून अमली पदार्थांचा पुरवठा होत होता. जो ती सुशात सिंग राजपूतला देत होती, असं एनसीबीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने ३५ आरोपींविरूद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला होता. आरोपपत्रात नमूद माहितीनुसार मार्च २०२० पासून त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यादरम्यान सर्व आरोपी गुन्हेगारी कटाचा भाग होते. विशेष म्हणजे हे सर्वजण कोणत्याही वैध परवान्याशिवाय प्रतिष्ठित लोकांना आणि बॉलीवूड मधील मंडळींना ड्रग्जची विक्री करत होते. 

सुशांतच्या पैशांवर रियाकडून ड्रग्जची खरेदी आरोपपत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीलाअमली पदार्थांची अनेक पाकीटं सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि इतरांकडून मिळत होती. यासाठी रियाने अभिनेता सुशांत सिंग आणि भावाच्या माध्यमातून पैसे जमा केले होते. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती नियमितपणे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही आरोपत्रात नमूद करण्यात आलं आहे. गांजा आणि चरस यांची ऑर्डर दिली जात होती आणि हे सर्व ड्रग्ज सुशांतला दिले जात होते अशीही नोंद करण्यात आली आहे.  

सुशांतच्या मृत्यूने माजली होती खळबळ सुशांत सिंग राजपूत १४ जून रोजी २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या आकस्मित निधनामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. कोणालाच बॉलिवूड स्टारच्या मृत्यूवर विश्वास बसत नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे सुशांतच्या कुटुंबियांनी अभिनेत्याच्या मृत्यूस रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :bollywoodबॉलिवूडDrugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो