शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

आश्चर्य! 6 महिन्यांपूर्वी मृत घोषित केलेली मुलगी घरी परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 18:56 IST

मे महिन्यात दिल्लीतील मुंडका भागात निहाल विहार येथे एका मुलीचे तुकडे तुकडे केलेला मृतदेह आढळून आला होता. याचवेळी झारखंड येथील एक मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावाला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दिल्लीला आणले असता त्याने ही आपली बहिण असल्याचे सांगितले होते.

ठळक मुद्दे६ महिन्यांमध्ये आपल्यासोबत काय काय घडले याची माहिती दिली असल्याचे रांचीच्या लापुंग पोलीस स्थानकाचे प्रमुख विकास कुमार यांनी सांगितलेमे महिन्यात दिल्लीतील मुंडका भागात निहाल विहार येथे एका मुलीचे तुकडे तुकडे केलेला मृतदेह आढळून आला होता. 6 महिन्यांपूर्वी हत्या झाली अशी शक्यता वर्तवण्यात आलेली मुलगी घरी परतल्याने पोलिसांपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला की, मग मे महिन्यात दिल्लीत सापडलेला मुलीचा मृतदेह नक्की कोणाचा?

नवी दिल्ली - ६ महिन्यांपूर्वी एका 16 वर्षीय मुलीची हत्या झाली असा अंदाज वर्तवणाऱ्या दिल्लीपोलिसांना जणू आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ही मुलगी घरी परतली आहे. झारखंडच्या रांची येथील ही मुलगी असून सोमवारी ती आपल्या घरी पोहोचली. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली आहे.

याबाबत आम्ही मुलीची भेट घेतली असून तिने गेल्या ६ महिन्यांमध्ये आपल्यासोबत काय काय घडले याची माहिती दिली असल्याचे रांचीच्या लापुंग पोलीस स्थानकाचे प्रमुख विकास कुमार यांनी सांगितले. एका मानव तस्कराने मुलीचे अपहरण करुन तिला चंदीगड येथे घेऊन गेला होता. या ठिकाणी त्याने मुलीला घरकामाला जुंपले होते, यानंतर ती नोएडा येथे काम करत होती अशी हकीकत पुढे आली आहे. 

मे महिन्यात दिल्लीतील मुंडका भागात निहाल विहार येथे एका मुलीचे तुकडे तुकडे केलेला मृतदेह आढळून आला होता. याचवेळी झारखंड येथील एक मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावाला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दिल्लीला आणले असता त्याने ही आपली बहिण असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटकही करून या हत्याकांडाचा तपास पूर्ण केला होता. पोलिसांनी प्लेसमेंट एजन्सीचा मालक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली. मनजीत करकेटा, गौरी आणि साहू असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता 6 महिन्यांपूर्वी हत्या झाली अशी शक्यता वर्तवण्यात आलेली मुलगी घरी परतल्याने पोलिसांपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला की, मग मे महिन्यात दिल्लीत सापडलेला मुलीचा मृतदेह नक्की कोणाचा?.  या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार असून तिन्ही आरोपींना कोठडीत घेऊन तपास करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनdelhiदिल्ली