शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर गेम खेळू दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा गळा दाबून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 12:58 IST

Crime News : शवविच्छेदन अहवालात अर्जुन यांचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सूरत :  मोबाइल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, पण तोच मोबाइल लोकांच्या आयुष्याचाही नाश करत आहे. गुजरातमधील सूरतमध्ये असेच एक प्रकरण समोर आले असून, वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मोबाइल गेम खेळण्यापासून अडवले असता मुलाने आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केला.

सुरत शहरातील इच्छापोर पोलीस स्टेशन परिसरातील कवास गावात राहणारे अर्जुन अरुण सरकार यांच्यासोबत ही घटना घडली. अर्जुन सरकार हे पत्नी डॉली आणि एका मुला अरुण यांच्यासोबत राहत होते. मंगळवारी अर्जुन यांना बेशुद्ध अवस्थेत पत्नी डॉली यांनी सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अर्जुन यांना मृत घोषित केले.

पत्नी डॉली आणि तिच्या अल्पवयीन मुलाने हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितले होते की, अर्जुन हे आठ दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडला होते, त्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर मंगळवारी ते झोपले होते, त्यानंतर ते पुन्हा उठले नाहीत. दरम्यान, मृत अर्जुन यांच्या पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या सांगण्यावरून रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.

शवविच्छेदन अहवालात अर्जुन यांचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती इच्छापोर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर १७ वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितले की, दिवसभर मोबाइलवर गेम खेळत असे, त्यामुळे वडील गेम खेळण्यास सतत मनाई करत होते. त्यामुळे मंगळवारी झोपताना वडिलांचा गळा आवळून खून केला.  दरम्यान, पोलिसांनी सध्या मृत अर्जुन सरकार यांच्या पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी