शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या खुनानंतर गुन्हा अंगलट येण्याच्या भीतीने पत्नी, प्रियकराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:40 IST

पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सातत्याने वाद होत असत

ठळक मुद्देगुन्हा अंगलट येण्याच्या भीतीने आरोपींनी स्वत:ला संपविलेप्रियकराने अब्रू जाईल या भीतीने केली आत्महत्या

रेणापूर (जि. लातूर) : खरोळा शिवारात एका पडक्या विहिरीत मृतदेह पोत्यात बांधून पुरल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रेणापूर पोलिसांनी मंगळवारी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर प्रकरणातील मयताची आरोपी पत्नी व प्रियकर या दोघांनीही गेल्या पंधरा दिवसांत वेगवेगळ्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आत्महत्या केली. 

लातूर जिल्ह्यातील रेणापूरनजीक असलेल्या खरोळा येथील मयत लखन ऊर्फ संदीप बालाजी राऊतराव (३०) आणि मनीषा (२६) यांचा पाच-सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर लखन आणि मनीषामध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होऊ लागले. सासरी होणाऱ्या या त्रासाबद्दल मनीषाने माहेरी आई, वडिलांना सांगितले होते. दरम्यान, हा वाद पुढे वाढतच गेला. त्यानंतर २७ मे रोजी मनीषाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मनीषाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती लखन राऊतराव आणि त्यांचा भाऊ व वडिलांविरुद्ध रेणापूर पोलिसांत ३१ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

यामध्ये विवाहितेचा दीर आणि सासऱ्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, पती लखन हा २६ मे पासूनच गायब होता. त्याच्या शोधात नातेवाईकांसह पोलीसही होते. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. मयत मनीषा व गावातील विजय छपरे यांचे प्रेमसंबंध समोर आले.  लखनचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मयत मनीषा आणि विजय छपरे याच्याविरुद्ध गु.र.नं. ३९५/२०२० कलम ३०२, २०१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोनि. गोरख दिवे यांनी सांगितले. 

६ तासांत पोलिसांनी लावला छडा... गायब असलेला लखन, पत्नी मनीषा आणि विजय छपरे या दोघांच्या आत्महत्या या घटनांनी पोलीस चक्रावून गेले. लखन गायब असल्याने पोलिसांना तपासाचा धागाच सापडत नव्हता. अखेर सोमवारी दुपारी लखनचा मृतदेह गावानजीकच्या ओसाड विहिरीत पोत्यात बांधून पुरल्याचे आढळून आले. लखनचा मृतदेह सापडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. लखनचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले. मंगळवारी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत लावला.

अब्रू जाईल या भीतीने केली आत्महत्यापोलिसांनी विजय छपरेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच विजय छपरेने आपल्या प्रेमाची कबुली दिली. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. मात्र, आपण केलेले कृत्य उघडकीस आले. यातून आपली अब्रू जाईल, असा विचार करून विजय छपरेने ६ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनSuicideआत्महत्याlaturलातूरPoliceपोलिस