शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत दोन विवाहित महिलांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 22:48 IST

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांनी संपवले जीवन..

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन दोन विवाहितांनी आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. पहिली घटना शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी तर दुसरी घटना शनिवारी (दि. १३) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली.सुप्रिया ज्ञानेश्वर मुंडे (वय २३, रा. विठ्ठलपार्क, गव्हाणे पेट्रोल पंपाच्या मागे, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात त्यांचा विवाह झाला होता. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आत्महत्येची दुसरी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रज्ञा मनोज भोरे (वय ३४, रा. विकासनगर, कॉलनी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञा आणि त्यांच्या पतीचे शुक्रवारी रात्री भांडण झाले होते. त्यानंतर पती घराबाहेर निघून गेला. प्रज्ञा यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. छळ होत असल्याचा प्रज्ञा यांच्या माहेरच्यांनी आरोप केला असून, त्यानुसार पोलिसांनी प्रज्ञा यांच्या पतीला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :bhosariभोसरीMurderखूनPoliceपोलिस