गुंज येथील कृषी केंद्र मालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 17:10 IST2020-06-28T17:10:46+5:302020-06-28T17:10:54+5:30
कुमार टेमकर यांनी गुंज येथील कृषी केंद्र पंधरा दिवसापासून बंद ठेवले होते.

गुंज येथील कृषी केंद्र मालकाची आत्महत्या
यवतमाळ: तालुक्यातील गुंज येथील प्रगतिशील शेतकरी तसेच शिवकृपा कृषी केंद्राचे मालक कुमार टेमकर (वय 42) यांनी शनिवारी कान्हेश्वर देवस्थानाच्या परिसरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, आई-वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
कुमार टेमकर यांनी गुंज येथील कृषी केंद्र पंधरा दिवसापासून बंद ठेवले होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण करू शकले नाही. हे घटनास्थळ पुसद ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे. कृषी केंद्र संचालकाची तालुक्यात ही पहिली आत्महत्या आहे.