शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 06:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : आरक्षण , सरकारी नोकरी व आर्थिक लाभ या उद्देशाने दोन मयतांच्या नावे चिठ्ठी तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : आरक्षण, सरकारी नोकरी व आर्थिक लाभ या उद्देशाने दोन मयतांच्या नावे चिठ्ठी तर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी दुसऱ्याच अक्षरात निघाली. तपासात बिंग फुटले अन् तीन वेगवेगळ्या समाजातील प्रकरणांत मंगळवारी गुन्हा दाखल झाला. 

दादगी (ता.निलंगा) येथे शिवाजी वाल्मिक मेळे (३२) यांचा १३ सप्टेंबरला करंट लागल्याने मृत्यू झाला. पंचनाम्यात चिठ्ठी मिळाली नव्हती. नंतर त्यांच्या घरातून चिठ्ठी मिळाली. ज्यात जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचे म्हटले. १४ सप्टेंबरला अनिल बळीराम राठोड (२७, रा. हणमंतवाडी तांडा, ता. चाकूर) यांचाही करंट लागल्याने मृत्यू झाला. तिथेही नंतर एकाने पोलिसांकडे अशीच चिठ्ठी दिली. २६ ऑगस्टला बळीराम श्रीपती मुळे (३६, रा. शिंदगी ता. अहमदपूर) यांनी विषारी द्रव प्राशन केले. एका नातेवाईकाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सादर केली. त्यामध्येही आरक्षणाचा उल्लेख होता. 

नेमका उलगडा कसा?अहमदपूर, निलंगा, चाकूर ठाण्यांमध्ये दाखल प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नैसर्गिक हस्ताक्षर आणि सादर झालेल्या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर जुळले नाही. त्यानंतर चाकूर पोलिसांनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चिठ्ठी लिहिणारी संशयित व्यक्ती निष्पन्न झाली. याच पद्धतीने तीनही प्रकरणातील संशयितांचे हस्ताक्षर नमुने तपासल्यानंतर शासकीय दस्ताऐवज परिक्षण विभागाकडे पाठविले. हस्ताक्षर   जुळत नसल्याचे अहवालात समोर आले.

कोणी लिहिल्या चिठ्ठ्या?जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न केलेला बळीराम मुळे यांची चिठ्ठी चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी भिवाजी मुळे याने लिहिली. मृत शिवाजी मेळेंबाबत चिठ्ठी माधव रामराव पिटले याने लिहिली. तर अनिल राठोड प्रकरणात चिठ्ठी शिवाजी फत्तू जाधव याने, नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड व तानाजी मधुकर जाधव यांच्याशी संगनमत करून नरेंद्र जक्कलवाड यांच्याकडून लिहून घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Reservation suicide notes backfire; crimes registered against three in Latur.

Web Summary : Latur: Three cases of forged suicide notes for reservation benefits exposed. Police investigation revealed handwriting discrepancies, leading to charges against individuals involved in fabricating the letters.
टॅग्स :reservationआरक्षण