शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य कंटाळवाणं झाल्याचा मेसेज करुन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:15 IST

अश्विनने कर्जबारीपणाला वैतागून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

मुंबई - लालबाग येथील  फिन्ले मिलबाहेर कारमध्ये वडिलांच्या पिस्तुलीनं गोळ्या झाडून अश्विन ललितकुमार जैन (वय ३९) यांनी केली आत्महत्या आहे. गोल्ड कमिशन एजंट असलेल्या अश्विनने कर्जबारीपणाला वैतागून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

लालबागमधील खटाव बिल्डिंगमध्ये राहणारे अश्विन जैन हे काल दुपारी २ वाजता घरातून निघाले. त्यानंतर ते घरी रात्री १० वाजले तरी घरी परतले नव्हते. त्यानंतर अश्विन यांनी त्याच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना माय लाईफ इज बोअर, मैं ये दुनिया छोड के जा रहा हूं असा मेसेज केला होता. याबाबत अश्विनच्या घरच्यांना समजताच त्यांनी रात्री १० नंतर काळाचौकी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. दरम्यान, आज दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास लालबागमधील डॉ. एस. एस. राव रोडवरील फिन्ले मिलबाहेर पार्क केलेल्या पिवळ्या रंगाच्या वॅगनआर कारमध्ये मृतदेह असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता पिस्तुलने गोळी झाडून अश्विन यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. अश्विन हे गोल्ड कमिशन एजंट म्हणून व्यवसाय करायचे आणि काळबादेवी येथे त्यांचे कार्यालय आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे अश्विन काही दिवसांपासून कर्जबाजारी झाले होते. त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस