शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या पैशाच्या छळावरून आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 11:21 IST

जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण भागात गोवर रुग्णांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

वडखळ : व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून पेण तालुक्यातील दिव गावातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात पैसे देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, दोन फरार आहेत.विजय म्हात्रे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  म्हात्रे यांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी साजन पाटील, मयूर धांडे व भूषण म्हात्रे (रा.वाशी, ता. पेण) यांच्याकडून सहा महिन्यांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. तीन महिने व्यवस्थित व्याज दिल्यानंतर काही कारणास्तव विजय याला व्याज देता आले नसल्यामुळे या तिघांनी विजयच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व मारहाण केली. असा प्रकार दोन ते तीन वेळा घडला. त्यांच्या या  त्रासाला कंटाळून विजय याने १७ नोव्हेंबर रोजी दिव येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या तरुणाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले याबाबतची तक्रार विजयची बहीण विजया रमेश म्हात्रे हिने वडखळ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार साजन, मयूर, भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भूषणला अटक केली असून अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर तपास करीत आहेत.

या गुन्ह्यातील तीनही आरोपींवरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार गुन्हा दाखल करून अवैध सावकारी धंद्याला आळा घालणे गरजेचे आहे. या आरोपींना राजकीय अभय असल्याने सावकारी गुन्हा दाखल होत नसेल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.- विवेक म्हात्रे, सरपंच, ग्रामपंचायत दिव 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस