शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

Suicide Attempt : बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात एका व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 21:13 IST

Suicide Attempt : याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वाघ यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे. 

ठळक मुद्देपांडुरंग वाघ असं या व्यक्तीचं नाव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्याच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवल्याने घटना टळली. पांडुरंग वाघ असं या व्यक्तीचं नाव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वाघ यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे. 

पांडुरंग वाघ हे अहमदनगर नेवासा येथील झापडी गावाचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी राज्य सरकारकडून २०१८ मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी ८ लाख ७२ हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केलं होतं. मात्र,  स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. स्थानिकांच्याच्या सततच्या विरोधामुळे वाघ यांना नुकसान होत होतं. शासनाकडून वाळू उपसण्याचं काम मिळाल्यानंतर सुद्धा वाघ त्यांना ते काम करता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानाला तोंड द्यावं लागत होतं. वाघ यांनी स्थानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील त्यात त्यांना काही यश आलं नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा सरकार दरबारी धाव घेतली. शासनाकडे भरलेले पैसे परत मिळावे म्हणून वाघ यांनी पाठपुरावा सुरू केला होता.

वाघ यांनी भरलेले ८ लाख ७२ हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. योग्य वेळी पोलीसांनी वाघ यांना अडवलं आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मथु दुर्घटना टळली. गावदेवी पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी ४१ (१) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर