शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात तीन सावकारांच्या घरावर उपनिबंधक पथकाची धाड; लाखोंच्या व्यवहाराची कागदपत्रे हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:25 IST

पीडितांच्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची कारवाई 

ठळक मुद्देमोठ्या व्यवहाराची अनेक कागदपत्रे,बॉंड लागली हाती

जालना : अवैधरित्या सावकरी करणाऱ्या तीन सावकारांच्या घरासह एका दुकानावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या चार पथकांनी धाडी मारल्या. या कारवाई मंगळवारी सकाळी अंबड तालुक्यातील सुखापुरी, रेवलगाव येथे करण्यात आल्या. या कारवाईत, बॉण्ड, चेक, रजिस्ट्रीसह इतर कागदपत्रे हाती लागली आहेत.

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील एकाने तीन सावकारांविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी चार टीम तयार केल्या. त्यानुसार मंगळवारी सकाळी या पथकांनी रेवलगाव येथील सरुबाई विश्वनाथ भोंडवे यांच्या घरी, सुखापुरी येथील काकासाहेब तुळशीराम राखुंडे यांच्या घरी, दुकानी, रामदास चोखाजी पटेकर यांच्या घरी धाड टाकली. या कारवाईत अनेक बॉण्ड, चेक, राजिष्ट्रीचे कागदपत्र सापडली आहेत. या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले. या पथकात अंबडचे सहाय्यक निबंधक परेश बेरा, जालन्याचे सहाय्यक निबंधक परमेश्वर वरखडे, घनसावंगीचे सहाय्यक निबंधक अजय भिल्लारे, परतूरचे सहाय्यक निबंधक प्रणव वाघमारे, भोकरदनचे सहाय्यक निबंधक श्रीराम सोनने यांचा सहभाग होता. 

३८ जणांचा सहभागअंबड तालुक्यातील रेवलगाव, सुखापुरी येथे पाच पथकांनी कारवाई केली. यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत २० अधिकारी, कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी व ८ पंच या ३८ जणांचा सहभाग होता.

कोट्यवधीचा व्यवहार उघडकीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली आहेत. यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहारांची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीडितांना तक्रारी नोंदवाव्यातसावकार पीडित नागरिकांनी काही तक्रारी असतील तर गोपनीय पद्धतीने नोंदवाव्यात. त्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. - नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, जालना

टॅग्स :JalanaजालनाfundsनिधीMONEYपैसा