शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळीत प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उलट तपासणी पुर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 19:05 IST

Hinganghat Case : न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाचे कारणाने १:०० वाजेपावेतो असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले.

ठळक मुद्देया प्रकरणामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अॅड.दीपक वैद्य हे सहभागी होते.

हिंगणघाट( वर्धा)  - येथील जळीतकांड प्रकरणात उलटतपासणीचे कामकाज  बुधवारी पूर्ण झाले. या प्रकरणाच्या मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव यांची  बचाव पक्षाकडून उलट तपासणीकरिता अँड भुपेन्द्र सोने यांनी  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांच्या समोर उलट तपासणीच्या कामकाजाची सुरुवात केली.

न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाचे कारणाने १:०० वाजेपावेतो असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. याप्रकरणातील  सरकारी विधीतज्ञ उज्वल निकम हे कोरोनाचे संकटामुळे प्रत्यक्ष न्यायालय हजर राहू शकले नाही मात्र सकाळी ११ वाजेपासून कामकाज संपेपर्यन्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांनीं सहभाग नोंदविला,  उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांची उलट तपासणीचे जबाणी पूर्ण झाल्यामुळे. सरकारी पक्षातर्फे साक्षदार तपासणीचे कामकाज संपविण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीच्या बयानाकरीता  उद्या २० मे  तारीख ठेवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या उलट तपासणीत अस्पष्टता असल्यामुळे त्याचा खुलासा करण्याकरीता व काही बाबी न्यायालयासमोर याव्यात यासाठी अँड. उज्वल निकम यांनी फेरतपासणी अर्ज केला असता त्या अर्जावर बचाव पक्षाचे व शासनाचे विधीतज्ञ यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून तो अर्ज नामंजूर केला. या प्रकरणामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अॅड.दीपक वैद्य हे सहभागी होते.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयHinganghatहिंगणघाटCourtन्यायालयPoliceपोलिस