शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फी भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाकडून अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 01:24 IST

घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली.

नालासोपारा (पालघर) : घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.सागर हा आदर्श चाळीत आई-वडील व आपल्या लहान भावासह राहत होता. वडील टॅक्सी चालक आहेत. आत्महत्या करताना सागरने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. वसई पूर्व येथील गोलाई नाका या परिसरातील इमानुल मिशन स्कूलमध्ये सागर नववीत शिकत होता. सागरची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला फी भरणे शक्य होत नव्हते. त्यासाठी शिक्षकांकडून सतत विचारणा होत होती. एका शिक्षकाने भर वर्गात फी कधी भरणार? असे विचारले. जर फी भरली नाही, तर परीक्षेला बसू देणार नाही, असेही सांगितले होते. त्यानंतर, सागरच्या वडिलांनी शाळेची फी लवकर भरू, असे आश्वासन त्याला दिले होते.नवव्या इयत्तेत शिकणारा सागर अभ्यासात हुशार होता. शुक्रवारी शिक्षकाने लवकरात लवकर फी भर, अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल, असे त्याला सांगितले. त्यानंतर, त्याने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. वडील शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत गेले. मात्र, शिक्षक भेटले नाहीत. सोमवारी सागर शाळेत जाऊन दुपारी १ वाजता घरी परतला. वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सायंकाळी ७ वाजता सागरने गळफास घेऊन आत्महत्या केली. वालीव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.मोबाइल गेला चोरीलायाबाबत अशीही माहिती समोर आली आहे की, सागरचा मोबाइल दोन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्या तणावातून त्याने हे पाऊल उचलले आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी