शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

अजबच! चोरांनी मालकाला केले बेडरूममध्ये बंद; काहीच न मिळाल्यानं जेवण करून झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:49 IST

Robbery Case : या घटनेनंतर एसडीएमने बंगल्यात रात्रीची सुरक्षा देण्याची मागणीही केली होती, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील एसडीएमच्या तक्रारीवरून कुश्मी पोलीस एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत.

बलरामपूर : बलरामपूर जिल्ह्यातील कुश्मी एसडीएम यांच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एसडीएमचा बेडरुम बाहेरून बंद करून खाण्यापिण्यावर ताव मारला आहे. या घटनेनंतर एसडीएमने बंगल्यात रात्रीची सुरक्षा देण्याची मागणीही केली होती, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील एसडीएमच्या तक्रारीवरून कुश्मी पोलीस एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत.वास्तविक, जिल्ह्यातील कुश्मी विकास गटाचे एसडीएम अजय किशोर  लकड़ा  यांनी सांगितले की, काल रात्री 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकघरातील खिडकीला लावलेला लोखंडी रॉड काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घर बंद केले. माझ्या बेडरूमची कडी बाहेरून लावली. त्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर हात साफ केला आहे. याशिवाय घरात ठेवलेल्या चालकाच्या मोटारसायकलची बॅटरीही चोरट्यांनी काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यातही चोरट्यांना यश आले नाही.ड्रायव्हरने गेट उघडलेयानंतर पहाटे पाचच्या सुमारास एसडीएमला जाग आली तेव्हा बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. त्यानंतर एसडीएमने त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून बोलावले. त्यानंतर चालक घरी आला असता घरातील सामान विखुरलेले आणि एसडीएम त्यांच्या बेडरूममध्ये बंद असल्याचे त्यांनी पाहिले.

भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासाबंगल्यात सुरक्षा नाहीएसडीएम अजय किशोर यांनी सांगितले की, रात्री त्यांच्या बंगल्यात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. त्यामुळे मोठी घटना घडण्याची भीती आहे. सध्या एसडीएमच्या तक्रारीवरून पोलीस एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात आणखी काही सुगावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश