शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

कर्जफेडीसाठी तरुणाचे अजब धाडस; घरात घुसून गावठी कट्टा रोखत केला लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:49 IST

मयूरपार्क येथील हरसिद्धी सोसायटीतील थरारक घटना

ठळक मुद्देहर्सूल पोलिसांनी केली आरोपीस अटक कुटुंबाने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला

औरंगाबाद : कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने चक्क घरात घुसून तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा रोखून लुटण्याचा प्रयत्न केला. घरातील मंडळींनी प्रसंगावधान राखून त्याला पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत कट्टा खाली पडल्याने आरोपीने पेपर स्प्रे मारून त्यांना झटका देत पळ काढला. मात्र, गल्लीतील तरुणांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना मयूरपार्कमधील हरसिद्धी सोसायटीत मंगळवारी दुपारी घडली.

राहुल रावसाहेब आधाने (वय २९, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज) असे  आरोपीचे नाव आहे. हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी संजय गाढे हे वाळूज औद्योगिक परिसरातील इंड्युरंस कंपनीमध्ये सरव्यवस्थापक आहेत.  गाढे कुटुंब राहुलला ओळखत नाही. मात्र, राहुलला गाढे परिवाराच्या कुटुंबाला संपूर्णपणे ओळखत होता. गाढे यांचा बंगला असल्याचे  माहित होते. आरोपी रांजणगाव येथील दूध  डेअरीवर कामाला आहे. लॉकडाऊन कालावधीत त्याच्यावर कर्ज झाले. पैशासाठी अनेक जण त्याच्याकडे तगादा लावत असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने गाढे परिवाराला लुटण्याचे प्लॅन रचला.  

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याने गाढे यांचे दार ठोठावले असता गाढे यांचा मोठा मुलगा सौरभने दरवाजा उघडला. यावेळी आरोपीने मला प्रशांत जोशी यांनी पाठवले आहे; साहेब आहेत का, असे विचारले.  वडील झोपले असल्याचे सौरभ त्याला सांगत असताना आरोपी घरात घुसला आणि त्याने गावठी पिस्टल काढून सौरभच्या कपाळावर रोखले. यानंतर आरोपीने एक लाख रुपये द्या, अशी मागणी केली. याचवेळी स्वयंपाक खोलीतून सौरभची आई बाहेर आली. त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला कशासाठी पैसे पाहिजे, असे विचारले. सौरभने त्याच्याजवळ ५ ते १० हजार रुपयेच  असल्याचे  सांगितले.  तेव्हा आरोपीने ५७ हजारांची गरज असल्याचे सांगितले. पैसे दिले नाही तर गावठी कट्टा देणारे  मला मारतील, असे तो म्हणाला आणि पिस्टल खाली केले. तो शांत झाल्याचे पाहून वरच्या खोलीत झोपलेल्या साहेबांकडून  पैसे घेऊन देतो, असे म्हणून सौरभ त्याला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तोपर्यंत  त्याच्या आईने आधीच संजय यांना हा प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार चालू असताना शेजारच्या खोलीतून सौरभचा लहान भाऊ तेथे आला. एकाच वेळी चौघांना  पाहून राहुलने सौरभच्या लहान भावावर पिस्टल रोखून पुन्हा पैसे मागितले. यावेळी सौरभसह तिघांनी त्याच्यावर झडप घालताच आरोपीच्या हातातील पिस्टल पडले.

पेपर स्प्रे मारून ठोकली धूम : घरातील सदस्यांचा रुद्रावतार पाहून त्याने खिशातील पेपर स्प्रे गाढे कुटुंबावर मारला. यावेळी झटापटीत त्याने घरातून धूम ठोकली. मात्र, त्याच्या मागे आरडाओरड करीत पळालेल्या गाढे परिवाराला पाहून गल्लीतील तरुणांनी त्याला पकडले.

गावठी कट्टा, चाकू, पेपर स्प्रे जप्त तरुणांनी त्याला चोप देत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोनि. सचिन इंगोले, सपोनि. नितीन कामे आणि कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पिस्टल, चाकू आणि पेपर स्प्रे  जप्त केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक