अमळनेर जि. जळगाव : अमळनेर शहरात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास काही समाजकंटकांनी एका दुकानावर किरकोळ दगडफेक केली. दोन हातगाड्या उलथवून फेकल्या. घटना घडताच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांनी गावात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. गावात तणावपूर्ण शांतता होती. या घटनेनंतर गावात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:30 IST