शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:56 IST

नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे.

नवी मुंबई : नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.पालिका आयुक्तांच्या वास्तव्यासाठी असलेल्या बंगल्यात हा प्रकार घडला आहे. सद्यस्थितीला त्या ठिकाणी नुकतीच बदली झालेले पालिकेचे माजी आयुक्त रामास्वामी एन. हे सहकुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. या बंगल्यातून गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान त्यांचा लॅपटॉप व एक मोबाइल चोरीला गेला.लॅपटॉप हा त्यांच्या वैयक्तिक वापरातला असून, मोबाइल त्यांच्या नातेवाइकांचा आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वयंपाक खोलीच्या खिडकीला ग्रिल बसवण्यात आलेले नाही, याचाच फायदा घेत गुरुवारी रात्री खिडकी उघडी राहिली असता, चोरट्याने आत प्रवेश केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.चोरट्याने बंगल्याच्या मागच्या बाजूच्या संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन)मधून बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. तर बंगल्यात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, त्या ठिकाणी चोरट्याने प्रवेश टाळलेला आहे. मात्र, उद्यानातील व भवतालच्या सीसीटीव्हीच्या तपासातून त्याचा उलगडा होऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई