शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाला चोरीला गेलेला मोबाइल सापडला मृताच्या खिशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 15:58 IST

वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई 

ठळक मुद्देकाही तासांनी अज्ञात प्रवाशाचा लोकल अपघातात मृत्यू झाला. त्याच्याकडे सापडलेला मोबाइल चोरीचा असल्याचे समजून आले.लोकलमध्ये प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने नामांकित कंपनीचा ५० हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला.

मुंबई - वाशी येथून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने नामांकित कंपनीचा ५० हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. काही तासांनी अज्ञात प्रवाशाचा लोकल अपघातात मृत्यू झाला. त्याच्याकडे सापडलेला मोबाइल चोरीचा असल्याचे समजून आले. त्यानंतर वडाळा रेल्वेपोलिसांनी संपूर्ण प्रकाराचा छडा लावला.

मंगळवारी घाटकोपर येथे राहणारे तक्रारदार प्रवासी संतोष गुप्ता (२६) वाशी येथून प्रवास करत होते. पहाटे ५.१९ वाजता वाशी येथून सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल पकडली. त्यांनी मोबाइल पॅन्टच्या खिशात वरच्या वर ठेवून झोपून प्रवास केला. गुप्ता यांना गाढ झोप लागली. या झोपेचा फायदा घेत चोरट्याने ५० हजार किंमतीचा मोबाइल चोरी केला. यासंदर्भात गुप्ता यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मंगळवारी सकाळी ७.३० वाजता रे रोड ते कॉटग्रीन रेल्वे स्थानकांदरम्यान अज्ञात प्रवाशाला लोकलची ठोकर लागली. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत प्रवाशाची तपासणी केली असता, नामांकित कंपनीचा ५० हजार रुपयांचा मोबाइल मिळाला.

या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक चोरी झालेल्या आयएमईआय क्रमांकासारखा होता. त्यामुळे हा मोबाइल चोरीचा असल्याचे आढळून आले. वडाळा रेल्वे पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला, तेव्हा मृत प्रवासी झारखंड येथील असल्याचे समजले. आरिफ शेख (२२) याने चोरीचा मोबाइल आपल्यासोबत बाळगला होता. पोलिसांनी मृत प्रवाशाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. मृत प्रवाशाचे प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.

टॅग्स :Mobileमोबाइलrailwayरेल्वेpassengerप्रवासीMumbaiमुंबईPoliceपोलिस