शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आईने दिले दोघा मुलांना चटके, वालीवच्या फादरवाडी येथील घटनेने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 07:31 IST

सनशाइन ग्रीन पार्क बिल्डिंग नंबर १ मध्ये नागनाथ सावसगळी हे दुसरी पत्नी नेहा आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या ८ आणि ७ वर्षांच्या मुलांसह राहतात.

नालासोपारा : सावत्र आईने सात वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर आठ वर्षीय मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली. मुलांच्या वडिलांनी गुरुवारी याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

सनशाइन ग्रीन पार्क बिल्डिंग नंबर १ मध्ये नागनाथ सावसगळी हे दुसरी पत्नी नेहा आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या ८ आणि ७ वर्षांच्या मुलांसह राहतात. नागनाथ यांची पहिल्या पत्नीपासून सोडचिठ्ठी झाल्यापासून दोन्ही मुलांचा सांभाळ ते करतात. जूनमध्ये वेळोवेळी आरोपी सावत्र आई नेहा हिने आठ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात घरातील पकडीने मारहाण व हातावर गरम चाकूने चटके दिले तर दुसऱ्या सात वर्षांच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिले. तसेच दोघांना मारहाण करण्याची धमकी देत फरशी पुसणे, झाडू मारणे, भांडी घासण्याची कामे करून घेतली. या प्रकाराबाबत वडिलांना सांगितले तर आणखीन मारहाण करण्याची धमकीसुद्धा सावत्र आईने मुलांना दिली होती. अखेर दोन्ही मुलांच्या वडिलांनी वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी तक्रारीनंतर सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे. तिने एका मुलाच्या हातावर आणि दुसऱ्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके देऊन मारहाण केली आहे. - जयराज रणवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वालीव पोलिस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी