शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सावत्र बापाने बलात्कारचा प्रयत्न केला, तरुणीने चहामध्ये नशेचे औषध मिसळले अन् उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:27 IST

उत्तर प्रदेशमधील लखनौ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील लखनौ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी लखनौमध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते, या प्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. या व्यक्तीची हत्या त्यांच्याच मुलीने आणि जावयाने केल्याचे समोर आले आहे. 

हत्या झालेला व्यक्ती त्या तरुणीचे सावत्र वडील होते.आरोपी तरुणीने या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ' सावत्र वडीलांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मी हत्या केली असल्याचे आरोपी महिलेने पोलिसांनी सांगितले. आरोपी महिला विवाहित आहे. तिने पतीच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

ही घटना लखनौच्या दुबग्गा परिसरातील आहे. फयाज असे मृताचे नाव आहे. ते ई-रिक्षा चालक म्हणून काम करायचे. फयाज हे 17 डिसेंबरला घरून निघाले, पण परत आले नाहीत. दोन दिवसांनंतर 19 डिसेंबरला आम्रपाली हॉस्पिटलजवळ फयाज यांचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sandeep Singh Haryana Minister: "देश सोडलास तर 1 कोटी देईन", महिला प्रशिक्षकाचा मंत्री संदीप सिंग यांच्यावर आणखी एक आरोप

फोन कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी सावत्र मुलगी आणि जावयाला अटक केली. चौकशीत दोघांनी खुनाची कबुली दिली. औषध आणि नंतर नायलॉन दोरी वापरली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या सावत्र वडिलांच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. फयाज झोपेत असताना महिलेने त्याची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. काही वेळाने पती घरी आल्यावर महिलेने त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाची आम्रपाली हॉस्पिटलजवळ विल्हेवाट लावली. 

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ई-रिक्षा मागवण्यात आली होती. मृतदेह ई-रिक्षावर चढवून दोन्ही आरोपींनी निर्जनस्थळी नेऊन मृतदेह फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस