मुंबई - गोवंडीत महिलेने एका १९ वर्षीय तरुणीची मंगळवारी दुपारी १२ वाजता गोळ्या झाडून हत्या केली. शिफा असे मृत तरुणीचे नाव आहे. पतीसोबत मृत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्या झाल्याचे समजते. या प्रकरणी दाेन संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत.
गुन्हा वैयक्तिक संबंधातून झाल्याचे सांगून तपासाबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यापासून आयुक्तालयापर्यंत एकाही अधिकाऱ्याने माहिती देणे टाळले. मृत तरुणी आणि आरोपी महिला एकमेकांच्या ओळखीच्या असून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती समोर आली. आपल्या पतीसोबत मृत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून संतापून हा गोळीबार झाल्याची माहिती समजते.
महिलेने पतीपासून दूर राहण्याबाबत त्या तरुणीला अनेकदा धमकावलेही होते. मात्र, त्यानंतर मृत तरुणीचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावत गेला. त्यातूनच विवाहितेने तरुणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले. आरोपी महिला पसार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणीस गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. याप्रकरणात शिवाजीनगर येथील खून प्रकरणाच्या अनुषंगाने २५ वर्षांची एक महिला आरोपी व २३ वर्षांचा एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Web Summary : In Mumbai's Govandi, a woman fatally shot a 19-year-old, Shifa, suspecting an affair with her husband. The woman had repeatedly threatened Shifa. Police have arrested two suspects in connection with the murder. The incident stemmed from a personal dispute, officials state.
Web Summary : मुंबई के गोवंडी में एक महिला ने 19 वर्षीय शिफा की गोली मारकर हत्या कर दी, क्योंकि उसे अपने पति के साथ संबंध का शक था। महिला ने पहले भी शिफा को धमकी दी थी। पुलिस ने हत्या के संबंध में दो संदिग्धों को गिरफ्तार किया है। अधिकारियों का कहना है कि घटना व्यक्तिगत विवाद का नतीजा है।