शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राज्यात दिवसाला दोन एसीबी ट्रॅप यशस्वी, आठ महिन्यांत ७५३ आरोपी जाळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:51 IST

राज्यातील विविध विभागांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष असून, नागरिकांची तक्रार दाखल होताच तातडीने त्याची पडताळणी करून एसीबीचे अधिकारी सापळा रचत आहेत.

- संदीप मानकर

अमरावती : राज्यातील विविध विभागांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष असून, नागरिकांची तक्रार दाखल होताच तातडीने त्याची पडताळणी करून एसीबीचे अधिकारी सापळा रचत आहेत. राज्यातील ट्रॅपची संख्या पाहता, दरदिवशी दोन सापळे यशस्वी होत असल्याचे निदर्शनास येते. १ जानेवारी ते २८ आॅगस्ट २०१८ या दरम्यान या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात ५६० सापळे यशस्वी झाले असून, यामध्ये ७५३ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. देशात नोटबंदीनंतरही लाचखोरांची संख्या कमी झाली नाही किंवा लाच स्वीकारण्याच्या घटनांवर अंकुश लागला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन २०१७ या वर्षांत ५७३ सापळ्यांमध्ये ७६७  आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. अनेकांची प्रकरणे अद्यापही न्यायप्रविष्ट आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात सापळ्यांची संख्या थोडी कमी झाली आहे. यामध्ये ठाणे विभागांमध्ये ६३ सापळे यशस्वी झाले आहेत, तर यामध्ये अन्य भ्रष्टाचाराचीही दोन प्रकरणे दाखल झाली होती.  पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक ११९ सापळे रचण्यात आले. नाशिक परिक्षेत्रात ५७, नागपूर परिक्षेत्रात ८६, अमरावती परिक्षेत्रात ७७, औरंगाबाद परिक्षेत्रात ७४ ट्रॅप झाले आहेत. नांदेड परिक्षेत्रात ५६ सापळे यशस्वी झाले आहेत. एसीबीची प्रत्येक विभागावर करडी नजर असून, कारवायांमुळे अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. 

अपसंपदाची १५ प्रकरणे दाखल१ जानेवारी ते २८ आॅगस्ट दरम्यान एसीबीने केलेल्या कारवाईमध्ये एकूण ५६० ट्रॅप यशस्वी झाले आहेत, तर अपसंपदाची १५ पकरणे पुढे आले आहेत. अन्य भ्रष्टाचाराची २० प्रकरणे दाखल झाली आहेत. अशा एकूण ५९५ दाखल प्रकरणांचा तपास राज्यातील एसीबी अधिकारी करीत आहेत. २०१७ मध्ये अपसंपदाची एकूण २२ प्रकरणे दाखल झाली होती. ४९ आरोपींची दोषसिद्धी जानेवारी ते २८ आॅगस्ट २०१८ पर्यंत ३८ शाबीत पकरणांमध्ये ४९ आरोपींची दोषसिद्धी झाली आहे. यामध्ये आठ खासगी व्यक्तींचाही समावेश आहेत. चार वर्ग १ चे अधिकारीसुद्धा यामध्ये समाविष्ट असून, वर्ग २ चे चार अधिकारी यामध्ये आहेत. दोष सिद्ध झालेल्या गुन्ह्यातील दंडात्मक रक्कम ही ८९ लक्ष २० हजार ५०० रुपये एवढी आहे. शाबीत प्रकरणांमध्ये सर्वाधिक सात प्रकरणे ही महसूल आणि भूमिअभिलेख व नोंदणी या विभागांची आहेत. पाच पंचायत समिती व तीन महापालिकेसह इतर अनेक विभागांचाही प्रकरणे यामध्ये आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी