शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडलेत... तर सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 13:39 IST

मुंबई पोलीस दलात ‘अद्ययावत ई चलान’चा शुभारंभ, एका क्लिकवर मिळणार राज्यभरातील कारवाईची माहिती

ठळक मुद्दे पोलिसांना नव्या मशिन्समुळे राज्यात कोणत्या ठिकाणी, कोणत्या नियमाचा भंग केला तसेच कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.मुंबईत हा प्रयोग यशस्वी होताच, त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे वारंवार नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो.  

मनीषा म्हात्रे

मुंबई - मुंबईसह राज्यभरातील पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असतानाच मुंबई वाहतूक पोलीस दलात अद्ययावत ई चलान मशीन दाखल झाल्या आहेत. यामुळे शहरात वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना नव्या मशिन्समुळे राज्यात कोणत्या ठिकाणी, कोणत्या नियमाचा भंग केला तसेच कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच वाहन चोरीचे असल्यास, त्याचाही लेखाजोखा उपलब्ध होणार असल्याने राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडले असतील तरी मुंबईत वाहन चालविताना सावधानता बाळगावी लागणार आहे.मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांवर कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या ई चलान प्रणालीला अद्ययावत यंत्रणेची जोड देत हा नवा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या मशिन्स हाताळण्याचे प्रशिक्षण वाहतूक पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात आले असून, शहरातील ३४ वाहतूक पोलीस विभागांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागात २० ते २५ मशिन्स देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी आणि अंमलदारांनी या नव्या मशिन्सचा बुधवारपासून कारवाईसाठी वापर सुरू केला आहे. येत्या काळात तब्बल १ हजार १०० मशिन्स वाहतूक पोलिसांना देण्यात येणार आहेत.नव्या ई चलान प्रणालीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढले जाते आणि स्वाक्षरी घेतली जाते. वाहनचालकाचा परवाना क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्ता नोंदविण्यात येतो. त्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्याने कोणता गुन्हा केला आणि दंडाच्या रकमेची माहिती लघुसंदेशाद्वारे दिली जाते. शिवाय, मेलद्वारे चलन पावती पाठविण्यात येते.नियम मोडणाऱ्याचा वाहन क्रमांक, वाहन परवाना क्रमांक आणि वाहतूक नियम कितीदा मोडले, याचीही संपूर्ण नोंद होते. ही माहिती आता मुंबईपुरती मर्यादित न राहता यामध्ये राज्यभरातील माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित वाहनावर कुठे काय गुन्हा आहे? ते वाहन चोरीचे आहे का? शिवाय राज्यात कुठेही कारवाई केली असल्यास, त्याची सर्व माहिती ई चलान मशीनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईत हा प्रयोग यशस्वी होताच, त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे वारंवार नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो.  मुंबईत ११०० मशिनचे नियोजनमुंबईत अकराशे अद्ययावत मशिन्स दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येत असून त्यानुसार, त्यांचे नियोजन सुरू आहे. प्रयत्न यशस्वी होताच, लवकरच याची माहिती देण्यात येईल. - अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई.  यापूर्वीच्या भूमिका 

पुण्यात हेल्मेट सक्ती तसेच नियम मोडणाऱ्यांच्या दंडात वाढ करण्यात आली होती. तसेच थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतली होती.  

गुन्हेगारीला आळा 

अनेकदा चोर चोरी केलेल्या वाहनाची नंबर प्लेट बदलून त्या वाहनाचा वापर गुन्ह्यासाठी करतात किंवा ते विकतात. मात्र या मशीनमुळे चोरी केलेल्या तसेच विकलेल्या वाहनाचा शोधही घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीलाही चाप बसण्यास मदत होईल.   

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसMumbaiमुंबई