एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमधून दोन दुचाकीची चोरी
By रोहित टेके | Updated: May 17, 2023 23:26 IST2023-05-17T23:26:59+5:302023-05-17T23:26:59+5:30
कोपरगाव आगारातील घटना

एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमधून दोन दुचाकीची चोरी
रोहित टेके, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर ) : शहरातील एस. टी. महामंडळाच्या आगारात उभ्या असलेल्या प्रत्येकी १५ हजार अशा एकूण ३० हजार किंमतीच्या दोन दुचाकी (क्र. एम. एच. १७ ए. वाय. ६५४६) व ( क्र. एम. एच. १७ ए. सी.९४८६) दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी गौतम अशोक खरात (वय ४०, रा. समतानगर, कोपरगाव ता. कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध बुधवारी (दि.१७) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपी सी. सी. टीव्हीमध्ये कैद झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तीकोने करीत आहेत.