शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अपघातप्रकरणी एसटी बसचालकास तीन महिन्यांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 18:06 IST

अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने बसचालकास  तीन महिन्यांचा कारावास व २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली

परतवाडा (अमरावती) : ऑटोरिक्षाला धडक देणाऱ्या एसटी बसचालकास स्थानिक न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा बुधवारी सुनावली. अचलपूर तालुक्यातील कुष्टाला निघालेल्या परतवाडा आगाराच्या एमएच ४० एन ८०६५ क्रमांकाच्या एसटी बसने ३ मे २०१६ रोजी सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चमक गावातून फाट्यावर येणा-या एमएच २७ पी ६१६० क्रमांकाच्या ऑटोरिक्षाला टी-पॉइंटवर धडक दिली होती. सरमसपुरा पोलिसांनी ऑटोरिक्षाचालक रमेश महानकर यांच्या तक्रारीवरून आरोपी बसचालक संजय महादेव सोळंके (रा. सांगवा बाजार) विरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस अधिकारी देवीदास खंडारे यांनी तपास पूर्ण करून अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी जखमी सुनीता नांदणे हिची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय पक्षाच्या युक्तिवादानंतर अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने बसचालकास  तीन महिन्यांचा कारावास व २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने जखमी पीडित मुलीला यापैकी २००० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश पारित केला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पंकज माहुरे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अतुल देशमुख यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती