शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

By पूनम अपराज | Updated: October 6, 2020 15:55 IST

SSR Case : वेगवेगळ्या सोशल मीडियावरून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या व मुंबई पोलिसांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” अशी माहित रश्मी करंदीकर यांनी सांगितली.सुशांत सिंग राजपूत मृत्यू ही आत्महत्याच होती. हत्या नव्हती असा खुलासा एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केल्यानंतर या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातनंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या अहवालाबाबत भूमिका स्पष्ट करताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईपोलिसांची प्रतिमा मलिन करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडियावरून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली असून “ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या अनेक अकाऊंट असलेल्यांवर आणि फेक अकाऊंटस्विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या व मुंबई पोलिसांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” अशी माहित रश्मी करंदीकर यांनी सांगितली. फेसबुक, ट्वीटरवर हजारो फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. यात अत्यंत खालच्या थराला जाऊन पोस्ट करण्यात आल्या आहे, असे मुंबई सायबर पोलिसांनी म्हटले आहे.

SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप

परमबीर सिंग पुढे म्हणाले, सुशांतप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानकारक होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंटस तयार करून  त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व फेक अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही सिंग यांनी दिली होती. सुशांत सिंग राजपूत मृत्यू ही आत्महत्याच होती. हत्या नव्हती असा खुलासा एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केल्यानंतर या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.  घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर ट्वीटकरून निशाणा साधला आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास वळवून ड्रग्स कनेक्शनवर आणला आणि त्यातही ड्रग्सबाबत तपासाकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? मुंबई पोलिसांना काही बड्या राजकीय नेत्यांना वाचवायचं होतं का?, मुंबई पोलीस कोणाला तरी वाचवतायेत का? असा सवाल भाजपाने केला होता.

 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडिया