शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

एसएस ग्लोबल कंपनीकडून पितापुत्राला २६ लाखाला गंडा

By शीतल पाटील | Updated: October 25, 2022 21:09 IST

SS Global विरोधात पोलिसांत दोन फिर्यादी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून SS Global कंपनीने पितापुत्रांची २६ लाखाची फसवणूक केली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात सोमवारी पिता-पुत्राने स्वतंत्ररित्या फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संशयित म्हणून मिलिंद बाळासो गाडवे, प्रियांका मिलिंद गाडवे, रवी गाडवे (तिघेही रा. सांगलीवाडी), अविनाश पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि चेतन चव्हाण (रा. मिरज) या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचा प्रमुख मिलिंद बाळासाहेब गाडवे (सांगलीवाडी) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. मिलिंद गाडवे याच्या एस. एस. ग्लोबल सह अन्य काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात २५ गुंतवणूकदारांची दोन कोटी ५ लाख ६० हजार ६९२ रूपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली होती.

तक्रारदारांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले होते. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी पदभार हाती घेतल्यावर आर्थिक फसवणूकीसंदर्भात संबंधितांनी धाडसाने पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देर सोमवारी कंपनीच्या फसवणूकीविरोधात दोन फिर्यादी दाखल झाल्या. वाहतुक व्यवसाय करणाऱ्या सुशिलकुमार महावीर गोखडे (रा. बालाजीनगर सांगली ) यांना संशयीत आरोपी गाडवे याने एसएसमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास एक वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. त्याला भूलून गोखडे यांनी कंपनीच्या बॅक खात्यात ९ लाख ३४ हजार ९५० रुपये जमा केले. वर्ष उलटून गेले तरी हाती काहीच रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गाखडे यांनी कंपनीतील संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही.

अखेर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयीत पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली. तर महावीर कल्लाप्पा गोखडे (रा. बालाजीनगर सांगली ) यांनी त्यांची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. जादा परताव्याच्या आमिषाने त्यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एसएस कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यासह नानाविध कंपन्यांनी नागरिकांना गंडा घातला आहे. आर्थिक फसवणूकीची व्याप्ती मोठी असून पोलीस तपासात कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीfraudधोकेबाजी