शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'आयएसआय'साठी हेरगिरी, लष्कराला भाजीपाला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 08:54 IST

spy isi pakistan intelligence agency : राजस्थानमधून हबीब खान नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हबीब खान याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला अटक केली आहे. राजस्थानमधून हबीब खान नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हबीब खान याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. (spy isi pakistan intelligence agency arrested delhi police crime branch pokharan rajasthan)

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा असा दावा आहे की, हबीब खानच्या अटकेमुळे मोठे हेरगिरीचे जाळे उघडकीस आले आहे. अटक केलेल्या आयएसआय एजंटनेही अनेक खुलासे केले आहेत. गुन्हे शाखेची टीम हबीब खानची सतत चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीब खानला राजस्थानच्या पोखरण येथून अटक करण्यात आली आहे. तो राजस्थानमधील बीकानेरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

हबीब खान हा सामाजिक घडामोडींत सुद्धा सक्रीय होता. हबीब खान गेली कित्येक वर्षांपासून कंत्राटदार म्हणून काम करत आहे, असे सांगण्यात येते. सध्या हबीब खान याच्याकडे भारतीय लष्कराच्या भागात भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट होते. तो लष्करी भागात भाजीपाला पुरवठा करीत होता. तसेच, हबीब खान हा पोखरण परिसरातील इंदिरा रसोईतील भाजीपाल्याच्या पुरवठा कराराशीही संबंधित असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने हबीब खानला राजस्थानच्या पोखरण येथून अटक केल्यानंतर दिल्लीला आणले. याठिकाणी त्याची चौकशी केली जात आहे. आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या हबीब खानची  केंद्रीय यंत्रणांनीही चौकशी केली. हबीब खान यांच्या चौकशीच्या आधारे आयएसआयचे मोठे जाळे उघडकीस आणता येईल आणि ते उधळून लावण्यास मदत होईल, असे तपास यंत्रणांना वाटते.

टॅग्स :ISIआयएसआयRajasthanराजस्थानdelhiदिल्ली