शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खाकीला काळिमा! तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 20:22 IST

माहीम पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३०९, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा १२० (ब), ११२ अन्वये गुन्हा दाखल केली. 

ठळक मुद्दे गणेश जलगावकर (५५) यांनी माहीम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याविरोधात मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या कानाखाली मारल्याने त्याचे डोके खुर्चीवर व टेबलावर आपटले.

मुंबई - फिर्यादीला मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरविलेल्या मुलाबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास मारहाण केली. तक्रारदाराच्या कानाखाली मारल्याने त्याचे डोके खुर्चीवर व टेबलावर आपटले. त्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाली. त्यानंतर गणेश जलगावकर (५५) यांनी माहीम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याविरोधात मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस उपनिरीक्षक सातव फरार आहे.  माहीम कॉजवे येथे राहणारे गणेश जलगावकर (५५) यांच्या इमारतीतील नदीम शेख यांची दोन लहान मुले गुरुवारी बेपत्ता झाली होती. त्यांचा शोध घेऊनही ती मुले न आढळल्यामुळे शेख यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांचा शोध घेतला, मात्र मुले आढळून आली नाहीत. ही बाब जळगावकर यांना समजल्यानंतर ते शेख आणि त्यांचा भाऊ या दोघांसोबत माहीम पोलीस ठाण्यात मध्यरात्री २ वाजता गेले. दरम्यान जलगावकर यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याकडे मुलांच्या शोधाबाबत चौकशी केली असता फिर्यादी यांना सातव यांनी मारहाण करीत टेबलावर पाडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर जलगावकर यांना कोठडीत बंद करून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सही करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी सही करण्यास नकार देताच पुन्हा जलगावकर यांना सातव यांनी मारहाण केली. त्यानंतर माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गडांकुश आल्यानंतर जलगावकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. नंतर सातव यांच्याविरोधात माहीम पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३०९, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा १२० (ब), ११२ अन्वये गुन्हा दाखल केली. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी