शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फेसबुक अकाउंट बनवून महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 20:49 IST

आरोपीने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून अशा पद्धतीने आणखी महिलेची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

ठळक मुद्देमहिलेच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल बनावणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. केतन हरीलाल यादव (53) असं अटक आरोपीचं नाव असून तो बोरीवली पूर्व येथील रहिवासी आहे.

मुंबई - लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर महिलेच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल बनावणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला ना.म. जोशी मार्ग पोलिसांनीअटक केली. आरोपीने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून अशा पद्धतीने आणखी महिलेची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

केतन हरीलाल यादव (53) असं अटक आरोपीचं नाव असून तो बोरीवली पूर्व येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडून तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. चिंचपोकळी येथे राहणारी पीडित महिलेने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावर वधू नोंदणी केली होती. त्यावेळी आरोपी त्यांच्या संपर्कात आला. तो नवी मुंबईतील सीझर इमारतीत वास्तव्याला असल्याचे सांगून त्याने या महिलेला लग्नाची मागणी घातली. महिलेने गावी राहणाऱ्या भावा व इतर नातेवाईकांना दाखवले. त्यानंतर महिलेचे कुटुंबीय आरोपीला भेटण्यासाठी नवी मुंबईत आले असता त्याने गेस्ट हाऊसमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी आपण जूनी रुम विकली असून पाम बीच रोडवर एक रुम खरेदी केल्याचे सांगितले. मात्र, नेहमीच्या या उत्तरामुळे महिला व तिच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या भावाला महिलेचे छायाचित्र पाटवून त्या खाली ही महिला गायब झाली असून बनावट सीमकार्डच्या सहाय्याने फसवणूकीचे काम करत असल्याचा संदेश त्याखाली लिहिला होता. त्याकडे महिला व तिच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केले. काही दिवसांनी महिलेच्या बहिणीला तक्रारदार महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. त्यावर तक्रारदार महिलेचे छायाचित्र होते. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यावर आरोपी व महिलेचे व्यक्तीगत छायाचित्र आरोपीने अपलोड केले. तसेच आरोपीला कुटुंबियांना दाखवण्यासाठी दिलेले छायाचित्रही आरोपीने अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला. याबाबतची माहिती तक्रारदार महिलेला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास केला असता आरोपी हा वसईतील एका विश्रामगृहात असल्याची माहिती पोलिसांना सापडला. त्यानुसार पोलिसांनी रविवारी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीFacebookफेसबुकPoliceपोलिसArrestअटक