शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्पीड ब्रेकर आला अन् त्या तरुणीने घेतली धावत्या रिक्षेतून उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:38 IST

तरुणीच्या प्रसंगावधानामुळे तिच्यासोबत घडणार अनर्थ टळला आहे.

ठळक मुद्देभावाच्या घराहून तरुणीने स्वतःच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षाचालक आरशातून तिच्याकडे वारंवार पाहत अश्लील चाळे देखील करत होतास्पीडब्रेकरसाठी रिक्षावाल्याने रिक्षाचा स्पीड कमी केला आणि याचा फायदा घेऊन घाबरलेल्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत पटकन धावत्या रिक्षेतून उडी मारली.

मुंबई - भावाच्या घरी गेलेली तरुणी आपल्या घरी परतत असताना अनर्थ घडणार होता. मात्र, तरुणीच्या प्रसंगावधानामुळे तिच्यासोबत घडणार अनर्थ टळला आहे. गेल्या वर्षांपासून महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून महिलांनी सतर्क राहण्याचे धडे गिरवले जातात. त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे. प्रसंगावधान दाखवत तरुणीने स्वतःची अब्रू वाचवली आहे. 

भावाच्या घराहून तरुणीने स्वतःच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. मात्र, रिक्षाचालक वारंवार तिला त्यांच्यासमोरील आरशातून न्याहळत होता. तिच्या हे लक्षातही आलं होतं. नंतर रिक्षाचालकाने रिक्षा चुकीच्यादिशेने वळवली आणि या घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. हा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात घडला आहे. गुरुवारी रात्री  २० वर्षीय तरुणी मुलुंड कॉलनी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे गेली होती. रात्री घरी परतण्यासाठी तिने रिक्षेने जाण्याचा निर्णय घेतला. या तरुणीने रिक्षावाल्याला मुलुंडच्या पंचरत्न भागात रिक्षा नेण्यास सांगितले. मात्र, या रिक्षाचालकाने रिक्षा भलत्याच दिशेने वळवल्याचा आरोप या मुलीकडून करण्यात आला. रिक्षाचालक आरशातून तिच्याकडे वारंवार पाहत अश्लील चाळे देखील करत होता, असं देखील त्या तरुणीचे म्हणणं आहे. या रिक्षावाल्याने रिक्षा चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान दाखवत तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारत स्वतःची अब्रू वाचवली.     स्पीडब्रेकर आला अन् तिने मारली रिक्षेतून उडी स्पीडब्रेकरसाठी रिक्षावाल्याने रिक्षाचा स्पीड कमी केला आणि याचा फायदा घेऊन घाबरलेल्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत पटकन धावत्या रिक्षेतून उडी मारली. दरम्यान रिक्षामधून उडी मारल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने तिला मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या तरुणीने मुलुंड पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तरुणीची तक्रार नोंदवून घेत आता अज्ञात रिक्षाचालकांचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाMumbaiमुंबई