शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घडामोडींना वेग! फडणवीसांच्या आरोपानंतर सचिन वाझे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या भेटीला; दुपारपासून तिसऱ्यांदा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 20:37 IST

Sachin Waze Met CP parambir singh thrice today : मनसुख हिरेन प्रकरणात आता जलद तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ठळक मुद्देविधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची  मागणी केल्यानंतर सचिन वाझे आज तिसऱ्यांना पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवास्थानाबाहेर सापडलेली स्फोटकानं भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता गती येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) पथकानं आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. तसेच दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ते पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आज पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झालेले आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात आता जलद तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी सापडल्याचा तपास NIAकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात आज NIA च्या पथकाने पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. या टीममध्ये IG दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने सुरुवातीला पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचीही त्यांनी भेट घेतली. NIA च्या पथकातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि विविध मुद्दे मुंबई पोलीसांकडून मागण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे NIA मुंबईत कधीही आपल्या तपासाला सुरुवात करु शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची  मागणी केल्यानंतर सचिन वाझे आज तिसऱ्यांना पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर ते बाहेर पडले असता त्यांना माध्यमांनीघेरले आणि मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. गाडी माझ्याकडे होती किंवा नव्हती यात आरोप काय आहे? असा सवाल त्यांनी माध्यमांना विचारला, अशी माहिती टीव्ही ९ ने दिली आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्तMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझे