शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लोकमत विशेष, महाजेनकोमध्ये गोलमाल; राखेपासूनचे २० कोटींचे सेनोस्फेयर २० लाखांत विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:52 IST

विदर्भात महाजेनकोमध्ये औष्णिक विद्युत केंद्रात सुरू आहे गोंधळात गोंधळ

नागपूर : सरकारी वीज निर्मिती कंपनी महाजेनकोमध्ये सध्या गोलमाल सुरू आहे. विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून तयार होणारे मौल्यवान सेनोस्फेयर कवडीमोल भावात विकले जात आहे. जवळपास २० कोटी रु. किंमत असलेले सेनोस्फेयर केवळ २० लाख रुपयांत विकल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने हा व्यवहार पाहण्यासाठी महाजेम्स नामक कंपनी तयार करून स्वत:चे अंग काढून घेतले. जबाबदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट फ्लाय अ‍ॅश कौन्सिलने यावर्षी बैठकही घेतली नाही.

महाजेनकोच्या कोराडी आणि खापरखेडास्थित औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांतून मोठ्या प्रमाणात राख बाहेर निघते. ही राख एकत्रित करण्यासाठी वारेगाव, कोराडी व खसारा येथे डम तयार करण्यात आले आहे. शिवाय पारशिवनी तालुक्यात एक धरण प्रस्तावित आहे. येथून राख घेण्यासाठी स्थानिक पातळीवर कंत्राट काढले जाते. राख डमच्या तलावाच्या काठावर जमा होते आणि सेनोस्फेयर पाण्यावर तरंगतो. सेनोस्फेयरसाठी वेगळी निविदा काढली जात नाही. राखेच्या निविदेसह त्याचाही निपटारा केला जातो. मात्र बाजारात या सेनोस्फेयरचे मूल्य अनेक पटीने अधिक आहे. बाजारात या राखेचे मुल्य १२०० रुपये टन असून सेनोस्फेयरची किंमत ६५ हजार रुपये टन आहे.

पूर्ण राज्याचा विचार केल्यास सरकारी विद्युत केंद्रातून जवळपास २० कोटी रुपये किमतीचे सेनोस्फेयर निघते. मात्र, राखेच्या निविदेत ३ लाख रुपये प्रति डेपोनुसार ते केवळ २० लाख रुपयांत खाजगी लोकांना विकले जाते.

कोट्यवधींचा बुडतो महसूलमहाराष्ट्र स्टेट फ्लाय अ‍ॅश कौन्सिलचे सदस्य सुधीर पालिवाल यांनी, सेनोस्फेयरकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाजेनको आणि राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे सांगितले. सेनोस्फेयरबाबत भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. आणि त्याचा लाभ घेतला तर आर्थिक फायदा होईल. विजेचे दर कमी करण्यासाठी हा महसूल महत्त्वाचा ठरेल. मात्र, सरकार या दिशेने काम करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.काय आहे सेनोस्फेयर?सेनोस्फेयर औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाºया कोळशाच्या राखेचे रूप आहे. जो हलका आणि गुळगुळीत असतो. हा सिलिका व अल्युमिनाद्वारे निर्मित असून त्यात हवा भरलेली असते. मात्र हा अतिशय टणक असल्याने त्याचा उपयोग हलकी आणि कठीण वस्तूंच्या निर्मिती कार्यात केला जाऊ शकते. टाईल्स आणि फॅब्रिकसमध्ये त्याचा उपयोग होतो. मशीन्सचे घर्षण नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.