शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 05:34 IST

शूटरला नेपाळमध्ये पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप कश्यपवर आहे, तर पारधीने इतरांसह शस्त्रे आणि इतर तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात किसन पारधी आणि अनुराग कश्यप  या दोन आरोपींची जामिनावर सुटका करण्यास विशेष मकोका न्यायाधीश महेश जाधव यांनी सोमवारी नकार दिला, अशी माहिती  सरकारी वकील महेश मुळे यांनी दिली. 

सिद्दीकी (वय ६६), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री, यांची गेल्यावर्षी १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या वांद्रे (पूर्व) भागात त्यांच्या मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. 

शूटरला नेपाळमध्ये पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप कश्यपवर आहे, तर पारधीने इतरांसह शस्त्रे आणि इतर तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक केलेल्या तब्बल २६ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका ) अंतर्गत गुन्हे दाखल असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कैदेत असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार,  गुन्हेगारी टोळीवर दहशत व दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने सिद्दीकी यांच्या हत्येची कटकारस्थान अनमोल बिश्नोईने रचली.

English
हिंदी सारांश
Web Title : Court Denies Bail in Baba Siddique Murder Case to Two

Web Summary : Court rejected bail for two accused in Baba Siddique's murder. Kishan Pardhi and Anurag Kashyap remain in custody. Siddique was shot dead last October. Anmol Bishnoi, brother of gangster Lawrence Bishnoi, is a fugitive.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCourtन्यायालय