शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड; हाताला धरून ओढतानाचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 09:12 IST

दक्षिण कोरियाची युट्यूबर महिला रात्रीच्या वर्दळीच्या वेळी मुंबईत फिरत होती. खार भागात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना होती.

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करू शकणारी घटना घडली आहे. एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड करतानाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन तरुणांनी तिचा हात पकडून तिला बळजबरीने ओढून नेत असल्याचा आणि तिचा पाठलाग करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

दक्षिण कोरियाची युट्यूबर महिला रात्रीच्या वर्दळीच्या वेळी मुंबईत फिरत होती. खार भागात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना होती. पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, परंतू या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे म्हटले आहे. ही महिला लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 

दोन तरुणांपैकी एकजण तिच्या खूप जवळ आला आणि तिने विरोध करूनही तो तिच्या हाताला पकडून स्कूटरवर बसविण्यासाठी ओढत होता. तसेच ती आली नाही म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला किस करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी तिने नो, नो असे म्हणत त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. यावरच हे तरुण थांबले नाहीत तर ती पुढे जात असताना पुन्हा मागून स्कूटर घेऊन आले आणि तिला आम्ही सोडतो, आमच्यासोबत बस असे सांगू लागले. यावेळी तिने माझे घर इथेच समोर आले असे सांगितले, तरी देखील हे तरुण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. पोलिसांनी तक्रार आलेली नसली तरी चौकशी सुरु केली आहे. व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या प्रकरणी दोघांनाही खार पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबीन शेख(19) आणि मोहम्मद अन्सारी (20) अशी दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत.

 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाMolestationविनयभंग