शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:01 IST

Crime news: पत्नीस अटक : शरीरसंबंधाच्या भीतीतून पत्नीचे कृत्य. सोमवारी पती अनिल यांनी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले होते, तेव्हा तिने नकार दिला होता.

- महालिंग सलगर

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शरीरसंबंधाबाबत असलेल्या भीतीतून वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास कुपवाडमध्ये घडली. अनिल तानाजी लोखंडे (वय ५३, रा. प्रकाशनगर, गल्ली नंबर ६, अहिल्यानगर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. कुपवाड पोलिसांनी पत्नी राधिका अनिल लोखंडे (वय २७) हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत अनिल लोखंडे हे गवंडी काम करीत होते. त्यांची पहिली पत्नी वैशाली हिचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. अनिल यांना काजल व शिवानी या दोन मुली आहेत. त्यांची लग्ने झाल्याने त्या दोघी सासरी राहतात. अनिल लोखंडे हे एकटेच घरी राहत होते. त्यांच्या जेवणाचे हाल होत असल्यामुळे नातेवाइकांनी त्यांचे दुसरे लग्न करण्याचे ठरविले.

नातेवाइकांनी वडी (ता. खटाव, जि. सातारा) येथील बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका हिच्याशी लग्न ठरवले. राधिका हिला जन्मापासून गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे मुलबाळ होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अनिल यांना हा प्रकार सांगण्यात आला होता. त्यानंतर नातेवाईकांच्या संमतीने दि.२३ मे २०२५ रोजी माधवनगर येथील मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. अनिल व राधिका यांचे लग्न होऊन अठरा दिवस झाले. दि.१० जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त राधिका हिला तिचा मावस भाऊ गणेश यांच्या घरी अनिल लोखंडे यांनी सोडले. रात्री ९.३० च्या सुमारास अनिल हे राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले. दोघेही रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अहिल्यानगर येथे घरी गेले.

राधिका हिला शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा नव्हती. परंतू इच्छा नसतानाही शरीरसंबंध ठेवण्यासाठी अनिल बोलत होते. मंगळवारी पती अनिल शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडतील, हा विचार मनात येऊन त्याची राधिकाला भीती वाटू लागली. त्या कारणावरून दोघांत वाद झाला. त्यानंतर पती अनिल झोपण्यासाठी अंथरुणावर पडले. त्यावेळी पाणी पिण्यास किचन रूममध्ये जाण्याचे नाटक करून राधिकाने येताना कुऱ्हाड आणली. त्यानंतर अनिल यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांचा खून केला.

राधिकाने तिचे नातेवाईक गणेश दुबळे यांना रात्री साडे बाराच्या सुमारास फोन करून हकीकत सांगितली. गणेश यांनी मृत अनिल यांचे पुतणे मुकेश लोखंडे (रा. वसंतदादा कारखाना, जुनी कॉलनी) यांना कळवले. त्यानंतर नातेवाईकांनी अहिल्यानगर येथे अनिल लोखंडे यांच्या घरी तातडीने धाव घेतली. मुकेश लोखंडे यांनी तातडीने कुपवाड एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. मिरजचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित राधिका हिला ताब्यात घेऊन पंचनामा केला. संशयित राधिका हिने पोलिसांना खुनाची कबुली दिली आहे. एमआयडीसी पोलिसांनी तिला अटक केली आहे.

प्रतिकाराची संधीच नाही

नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा अनिल लोखंडे हे अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजारी रक्ताने माखलेली कुऱ्हाड होती. अनिल यांना प्रतिकाराची संधी न देताच राधिकाने त्यांचा खून केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

आदल्या दिवशी नकारसोमवारी पती अनिल यांनी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले होते, तेव्हा तिने नकार दिला होता. तसेच त्यांना अडवले होते. परंत मंगळवारी ते शरीरसंबंध ठेवतील अशी तिला भीती वाटत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अखेर तिने पाणी पिण्यास जाण्याचे नाटक करून कुऱ्हाड आणून पतीवर वार केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी