Sonam Raghuwanshi Latest Video: ज्यांच्या मदतीने सोनम रघुवंशीने राजा रघुवंशीची हत्या केली, त्या आरोपींचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोनम आणि राजा ज्या दिवशी त्या वाटेने चालत गेले होते, त्याचव वाटेवरून परतणाऱ्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात तिन्ही आरोपी कैद झाले आहेत. सोनम आणि राजाच्या काही अंतरावर पुढे हे आरोपी चालत होते. देव सिंह या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. देव सिंगनेच राजा आणि सोनमचा व्हिडीओ शेअर केला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी सोनमसह पाच जणांना अटक केली आहे. यापैकी तीन आरोपी व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपींचा व्हिडीओ
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तिन्ही आरोपी वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. काठीच्या आधाराने ते चालत आहेत. यात पहिला जो दिसत आहे, त्याचे नाव विशाल आहे. त्याच्या पाठीमागे चालत असलेल्या आरोपीचे नाव आनंद आहे. शेवटचा आणि तिसरा आरोपी आहे आकाश राजपूत.
वाचा >>कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
देवसिंग यांनी सोनम आणि राजाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो एआयच्या मदतीने बनलेला व्हिडीओ असल्याच्या कमेंट्स केल्या गेल्या होत्या. त्यावर देव सिंगने म्हटले आहे की, हे मूळ व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ तपास यंत्रणांना देण्यास तयार आहे, असेही त्याने म्हटले आहे.
राजा आणि सोनमचाही शेवटचा व्हिडीओ
देव सिंगच्या कॅमेऱ्यात सोनम आणि राजाचाही व्हिडीओ आलेला आहे. संपूर्ण शूट केलेला व्हिडीओ बघत असताना त्याला सोनम आणि राजा दिसले. त्यानंतर त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. राजाबद्दल मला वाईट वाटत असल्याचेही तो म्हणाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी दुपारी अंदाजे २ वाजता राजाची हत्या केली गेली. सोनम ज्या शर्टमध्ये दिसत आहे, तो शर्ट राजाच्या मृतदेहाजवळ सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी पहिल्यांदा आकाशला अटक केली. त्यानंतर इतर आरोपीही पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशातील राजीपूरमध्ये अटक केली होती.