शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:45 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सोनम रघुवंशीचा मेघालयात तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या झाल्यापासून शोध सुरू होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी तिला अटक केली.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सोनम रघुवंशीचा मेघालयात तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या झाल्यापासून शोध सुरू होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी तिला नंदगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका ढाब्यावरून अटक केली. गाझीपूर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम ढाब्यावर पोहोचली आणि तिथे काम करणाऱ्या साहिल यादवकडे मोबाईल मागितला आणि तिचा भाऊ गोविंद रघुवंशीशी संपर्क साधला. 

साहिल म्हणाला, "सोनम रात्री १ वाजता ढाब्यावर आली, खूप घाबरली होती आणि रडत म्हणाली की, तिला घरी फोन करायचा आहे. मी तिला माझा मोबाईल दिला, ती तिच्या कुटुंबाशी बोलली. मग मी तिला बसण्यास सांगितलं आणि पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस आले आणि तिला घेऊन गेले. सोनम एकटी होती आणि तिने ती कुठून आली आहे किंवा कुठे जात आहे हे सांगितलं नाही."

सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

उत्तर प्रदेश पोलिसांचे ADG अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने तिच्या कुटुंबाला इंदूरमध्ये फोन करून तिच्याबाबत माहिती दिली. कुटुंबाने इंदूर पोलिसांना माहिती दिली, ज्यांनी गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला. सोनमला प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर सखी वन स्टॉप सेंटरमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. इंदूर आणि मेघालय पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे आणि दोन्ही राज्यांचं पोलीस पथक गाझीपूरला पोहोचत आहेत.

"सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?

राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "जर सोनमने आमच्या मुलाला मारलं असेल तर तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कोणती पत्नी सांगेल की जा आणि चेन घेऊन या. सोनमनेच प्लॅन केलेला असणार. ज्यांना पकडण्यात आलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. लग्नानंतर घरात सोनमचं वागणं खूपच चांगलं होतं. ती असं काही करू शकते यावर आमचा अजूनही विश्वासच बसत नाही" असं राजाच्या आईने म्हटलं आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक