शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Phogat: ती सोनाली, मी आधीच ओळखलेले, पण...; प्रत्यक्षदर्शीने सांगितले कर्ली क्लबमध्ये नेमके काय घडलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 14:36 IST

Sonali Phogat before Death: कर्ली क्लबमध्ये सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कर्ली क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे.

भाजप नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. असे असताना कर्लीच्या क्लबमध्ये त्या रात्री काय घडलेले, सोनाली आणि तिचा पीए दोन तास बाथरुममध्ये काय करत होते आदी गोष्टींची उकल करणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. 

मोठा ट्विस्ट! सोनाली फोगाट अन् पीए हे पती-पत्नी? गुरुग्रामच्या फ्लॅटने पेच आणखी वाढविला

कर्ली क्लबमध्ये सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कर्ली क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे. सोनाली त्या रात्री डान्स पार्टीमध्ये नाचत होती. ती आणि तिचे स्टाफ मेंबर्स एकत्र नाचत होते. मात्र, अचानक सोनालीची तब्येत बिघडायला लागली. यामुळे थोड्या वेळाने सोनालीला तिथून जावे लागले, असे त्याने आजतकला सांगितले. 

सोनालीची जेव्हा तब्येत खराब झाली तेव्हा गोंधळ उडाला. सारे तिकडे धावले. मी तिला पाहताच ओळखले की ती टिकटॉक स्टार सोनाली आहे. यानंतर लगेचच काही लोक सोनालीला टॉयलेटच्या दिशेने घेऊन जात असल्याचे मी पाहिले. यानंतर सारे आपापल्या कामात व्यस्त झाले. यामुळे आम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट पाहू शकलो नाही. नंतर आम्हाला वाटले की यात काही नवीन नाही, जास्त दखल न दिलेली चांगली, असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

चार जणांना अटक...सोनाली त्याच्या पीएसोबत ज्या क्लबमध्ये गेली होती, त्या क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. या क्लबच्या बाथरुममध्ये ड्रग्ज सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. सोनाली फोगाटचा पीए सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, कर्ली क्लबचा मालक आणि एक ड्रग पेडलर यांना अटक करण्यात आली आहे. सोनाली सोबत त्या क्लबमध्ये तिचा पीए, मित्र आणि आणखी दोन महिला होत्या. तसेच सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिला क्लबमधून हॉटेलवर नेण्यात आले, तो कॅब ड्रायव्हर, तिला हॉस्पिटलला नेण्यात आले तो दुसरा कॅब ड्रायव्हर यांची चौकशी केली जाणार आहे. 

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटBJPभाजपा